नितीन मुंडावरेंनी घेतला सटाणा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा

उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावर दाखल झाले यावेळी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाची प्रथमता पहाणी केली. त्यानंतर शहरातील विविध वैशिष्टपूर्ण विकास कामांची पहणी केली. त्यात पाठक मैदान परिसरातील नाना नानी पार्क, नव्याने निर्माण होत असलेला रिंग रोड व नव्याने विकसित होत असलेल्या मोकळ्या भूखंडांची पहाणी केली.

    सटाणा : नगर परिषदेच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देषानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडून सटाणा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती सटाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

    यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी सटाणा शहराच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. तसेच पुनद पाणीपुरवठा योजना संत गतीने चालत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली सटाणा नगरपालिकेच्या सभागृहात विभाग प्रमुखांच्या कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    सकाळी ८ वा. उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावर दाखल झाले. यावेळी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाची प्रथमता पहाणी केली. त्यानंतर शहरातील विविध वैशिष्टपूर्ण विकास कामांची पहणी केली. त्यात पाठक मैदान परिसरातील नाना नानी पार्क, नव्याने निर्माण होत असलेला रिंग रोड व नव्याने विकसित होत असलेल्या मोकळ्या भूखंडांची पहाणी केली. पुनद पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत शहराच्या वितरण वाहिनीच्या कामकाजाची पहाणी केली. तसेच चौगाव बर्डी येथील दोन जलकुंभांचे बांधकाम, व कचरा डेपो पहाणी करुण त्यांनी सटाणा नगर पािलकेत विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

    यावेळी मुंडावरे यांनी, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जल, अग्नी, वायू या घटकांमध्ये नगर परिषदेचे काम उंचविण्याचे निर्देश देत, शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व रेन वॉटर परकुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली व आरोग्याविषय माहिती घेतली. नगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या कामकाजाचीदेखील पहाणी केली. माझी वसुंधरा या योजनेसंबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली व सूचनाही केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी मुंडावरे यांनी थेट पुनद धरणावर जाऊन पुनद पाणीपुरवठा योजनेसंदर्भात डब्ल्यूटीपी, जॅकवेल, सर्वच कामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.