चालक व व्यवस्थापकांवर गुन्हा ‘मोहन’ला नोटीस; पुढील आदेशपावेतो सिनेमागृह बंद

छावणी पोलीस ठाण्याचे पो.शि. वासुदेव नेरपगार यांच्या फिर्यादीवरून सिनेमागृह चालक यश राकेश पांडे व व्यवस्थापक दिलीप पवार यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गुन्हा दाखल करीत महापालिका आयुक्त दीपक कासार यांना मोहन सिनेमागृह सील करण्याबाबत पत्र दिले होते.

    मालेगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना मोहन सिनेमागृहात शुक्रवार दि. १९ रोजी प्रदर्शित झालेला मुंबई सागा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून एकच गर्दी केली होती. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काल शनिवार रोजी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिनेमागृह चालक व व्यवस्थापक यांच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    छावणी पोलीस ठाण्याचे पो.शि. वासुदेव नेरपगार यांच्या फिर्यादीवरून सिनेमागृह चालक यश राकेश पांडे व व्यवस्थापक दिलीप पवार यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गुन्हा दाखल करीत महापालिका आयुक्त दीपक कासार यांना मोहन सिनेमागृह सील करण्याबाबत पत्र दिले होते. महापालिकेच्या प्रभाग अधिकारी सुनील खडगे व पथकाने आयुक्तांच्या आदेशानुसार रविवार दि.२१ रोजी मालक व व्यवस्थापक यांना नोटीस बजावली व पुढील आदेशपावेतो सिनेमागृह प्रेक्षकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले.