chhatrapati sambhaji raje bhosle

नाशिकमध्ये २६ सप्टेंबरला झालेल्या मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित होते. मराठा आंदोलनाबाबत उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका असा आदेशच खासदार संभाजीराजेंनी आपल्य समर्थकांना दिला आहे.

नाशिक : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी आज नाशिकमध्ये (Nashik) भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणींची भेट घेतली आहे. या भेटीमुळे मराठा आंदोलनाच्या नेतृत्त्वावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

खासदार संभाजी राजे हे नासिक दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी नाशिकमध्ये राहणाऱ्या मनिषा राजेंच्या घरी पोहोचले. मनिषा राजे ( Manisha Raje) यांनी भेटीसाठी आग्रह केला होता. यानंतर संभाजीराजेंनी सदिच्छा भेट दिल्याचे समजते आहे.

नाशिकमध्ये २६ सप्टेंबरला झालेल्या मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीला छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित होते. मराठा आंदोलनाबाबत उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका असा आदेशच खासदार संभाजीराजेंनी आपल्य समर्थकांना दिला आहे.


तसेच सर्व मराठी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करु आणि वेगवेगळ्या दबाव निर्माण करणाऱ्या समिती तयार करु अस छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.