काेराेनाच्या धास्तीने एकाची आत्महत्या

शिर्डी : कोरोना झाल्याने त्याची धास्ती घेऊन गोदावरी नदी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात दिनांक ३० सप्टेंबर रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, याबाबत शहर पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मयताच्या भाच्याने शहर पोलिस ठाण्यामध्ये खबर दिली आहे की, कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील एका ४७ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना झाल्याच्या धास्तीने या इसमाने कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली आहे. संबंधित इसमाचा मृतदेह कोकमठाण शिवारातील होमाडपंथी महादेव मंदिराजवळ मिळून आला आहे.

दरम्यान, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये ४१/२० सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे करीत आहे.