One-day symbolic strike of Mathadi workers, onion and grain auctions in market committees closed, turnover of Rs 25-30 crore halted

नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख १५ बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने एक दिवसीय लाक्षणिक संप (strike of Mathadi workers) पुकारल्याने कांदा व धान्याचे लिलाव बंद ( market committees closed) असल्याने शुकशुकाट दिसत आहे.

लासलगाव : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी कायद्यामुळे (Farmer Bill) कृषी व पणन कायद्यात बद्दल झाल्याने शेतकरी व कामगारांना उद्ध्वस्त करणारे असल्याने तातडीने नव्याने केलेला कायदा रद्द करावा तसेच राज्य शासनाने तमाम माथाडी कामगारांच्या (Mathadi workers) प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी या मागण्यांसाठी आज नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख १५ बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने एक दिवसीय लाक्षणिक संप (strike of Mathadi workers) पुकारल्याने कांदा व धान्याचे लिलाव बंद ( market committees closed) असल्याने शुकशुकाट दिसत आहे. या संपामुळे जिल्ह्यातील २५ ते ३० कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली

केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेले बदल व नवीन कायद्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान होत आहे माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न राज्य सरकारकडून सोडविले जात नाहीत कोरोनाच्या संकटात माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे केली काही कामगारांचा काम करताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे रेल्वेने प्रवास करण्यास कामगारांना रेल्वे पास व तिकीट द्यावे यासह एकूण १४ मागण्यांसाठी लाक्षणिक संप पुकारण्यात आल्याचे लासलगाव बाजार समिती हमाल मापारी संचालक रमेश पालवे यांनी सांगितले

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र राज्य सरकारकडे विविध विभागाकडे प्रलंबित मागण्या…..

कोरोनाच्या संकटात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन काम केले त्यात काही कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे.

रेल्वेने कामावर ये-जा करण्यासाठी माथाडी कामगारांना रेल्वेपास / तिकीट मिळावे.

कांदा-बटाटा भाजीपाला फळे माल सरकारच्या पणन विभागाने बाजार समितीच्या नियमणातुन मुक्त केला आहे त्यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होत आहे त्याकरिता हे नियम कायम करणे.

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व पुनर्रचनेत सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेते यांची सदस्य म्हणून नेमणूक करणे.

विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचनेत माथाडी मंडळावर नोंदीत माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनच्या नेत्यांची मंडळ सदस्य म्हणून नेमणूक करणे.

विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुला-मुलींना काम करण्यासाठी संधी देणे.

विविध माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन, सचिव यांच्या नेमणुका करणे.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कामगार यांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडून कोण आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात विश्रांतीगृह पिण्याचे पाणी स्वच्छतागृह इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे.

बाजार समितीच्या आवारात संपूर्ण मालिकेने आणि व्यापारी वर्गाचा व्यापार चालणे आणि माथाडी कामगार महत्त्वाची कामे मिळण्याबद्दल उपाय योजना करणे

सिडको म्हाडामार्फत माथाडी कामगारांना घरे मिळण्याबाबत

विविध रेल्वे यार्डातील माथाडी कामगार विश्रांतीगृह पिण्याचे पाणी स्वच्छतागृह इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत

माथाडी कामगारांनी हक्काची कामे मिळण्या करिता पोलीस संरक्षण महिन्याची माथाडी ॲक्ट १९६९ मधे तरतूद करणे अथवा पोलीस यंत्रणेकडून संरक्षण मिळण्यासाठी परिपत्रक काढणे

माथाडी ॲक्ट १९६९ व विविध माथाडी मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी माथाडी कामगारांना हक्काची काम मिळण्यासाठी हक्काच्या कामात येणारे अडथळे दूर होण्यासाठी कामगारांवर होणारी गुंडागिरी थांबण्यासाठी उपाय योजना करणे