nashik accident death

चेहेडी जकात नाका येथील नाशिकरोडकडून(Nashik) सिन्नरकडे(Sinnar) जाणाऱ्या आयशरने दुचाकी धडक दिल्याने पळसे दारणा सकुंल येथील युवक जागीच ठार(Death In accident On Chehedi Jakat Naka) झाला आहे.

  नाशिक रोड : नाशिक-पुणे महामार्गवरील(Nashik  Pune Highway) चेहेडी जकात नाका येथील नाशिकरोडकडून(Nashik) सिन्नरकडे(Sinnar) जाणाऱ्या आयशरने दुचाकी धडक दिल्याने पळसे दारणा सकुंल येथील युवक जागीच ठार(Death In accident On Chehedi Jakat Naka) झाला आहे. आयशरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी महामार्ग नागरिकांनी गर्दी केली होती. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

  नाशिक पुणे महामार्ग चेहेडी जकात नाका येथे सिन्नरकडे जाणाऱ्या आयशर क्रमांक एम एच ४२ बी ८९०५ या गाडी दुचाकी क्रमांक एच एच १५ एच पी २५८५ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याने या अपघातात हेमंत कुमावत हा युवक जागीच ठार झाला आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

  प्रशासन, लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
  नाशिक-पुणे महामार्गवरील सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंतच्या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे. तीन ते चार दिवसांपूर्वीच पळसे येथे गतिरोधकामुळे झालेल्या अपघात एकाला अपघातात जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असताना मंगळवारी पुन्हा चेहेडी जकात येथे अपघात तरुण युवकांचा जीव लागला आहे.  गेल्या काही महिन्यात असे जीव  जात आहे. मात्र ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे स्पेशल दुर्लक्ष करत आहे.

  नागरिकांचा पोलिसांवर संताप
  सिन्नर फाटा ते चेहेडी दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण आहे. मात्र हे पावसाचे कारण देत काम बंद केले आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारचे फलक लावले नाही. वाहनधारकांना  रस्ता लक्षात येत नाही. त्यामुळे या दरम्यान अपघाताची सत्र सुरू आहे. मात्र याच दरम्यान पोलीस वाहतूक विभागाकडून वाहन तपासणी केली जाते. मात्र त्यांना ही खड्डे दिसत नाही. त्यामुळे पोलिसांवर नागरिक संताप व्यक्त करत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घेत नाशिक सिन्नर टोलवेजवर कारवाई करावी किंवा येथील व्यवस्थापन कर्मचारी बदलावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

  सिन्नरफाटा ते चेहेडी दरम्यान रस्त्याच्या कामांची मुदत संपली आहे. कंत्राटदार  दंड भरून हे काम करत आहे. टोल प्रशासनाने येत्या काही दिवसांत रस्ता पूर्ण करावा व वाहनांकांचे हाकनाक बळी जात ते थांबवावेत. तसेच जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली बंद करावी, अशी मागणी संबधित विभागाकडे करणार आहे, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.