नाशिक-पुणे महामार्गावर अपघात; ट्रकखाली चिरडून एकजण ठार

    नाशिक रोड (वा) : नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे या गावी दुचाकीस्वार आयशर ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्पीड ब्रेकर चुकवण्यासाठी

    रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली. परंतु, पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी दुचाकी रस्त्याच्या कोपऱ्यावर घसरून ट्रकच्या पाठीमागील चाकात गेल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव नवाज जहीर खान (३५, रा. भद्रकाली दूध बाजार, नाशिक) असे असून खान पळसे गावाजवळून असताना सिन्नर ऊन नाशिकच्या दिशेने येणारा ट्रक (क्रमांक एम एच १२ एचडी ३२६१) पाठीमागे असलेल्या चाकाखाली खान यांची दुचाकी आल्याने भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी एकजण जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे, याबाबत पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहे.