लक्झरी बस व ट्रकच्या अपघातात एक ठार

चांदवड : मुंबई-अाग्रा महामार्गावर बस-ट्रकचा अपघात झाल्यानंतर बस उलटल्याने या बसखाली सापडल्याने पादचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. तसेच जवळच उभ्या असलेल्या अाेम्नी कार तसेच दाेन टपऱ्यांचेही या अपघातात नुकसान झाले.

सिग्नल व गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी
चांदवड : मुंबई-अाग्रा महामार्गावर बस-ट्रकचा अपघात झाल्यानंतर बस उलटल्याने या बसखाली सापडल्याने पादचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला. तसेच जवळच उभ्या असलेल्या अाेम्नी कार तसेच दाेन टपऱ्यांचेही या अपघातात नुकसान झाले.

अनर्थ टळला
सिन्नर एमआयडीसीमधून मालेगावला गॅस टाक्या घेऊन जाणारी ट्रक (एम. एच १२, सी. टी. ३७८७) येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर मालेगावकडे जाण्यासाठी वळण घेत होती. यावेळी मालेगावकडून नाशिककडे भरधाव वेगाने येणा-या लक्झरी बस (जी.जे, १४, एक्स. ४१०१) चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. बस वेगात असल्याने अपघातानंतर बस उलटली. यावेळी सुनील माधवराव व्यवहारे (६२) हे बसखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बसमध्ये असलेले िकमान ४० ते ५० प्रवासी मात्र थाेडक्यात बचावल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बारावकर, पोलीस हवालदार हरीशचंद्र पालवी, अमित सानप, योगेश हेबाडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

गतिराेधकाची मागणी
येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. या चौफुलीवर सिग्नल किंवा गतिरोधक नसल्याने नाशिककडून मालेगावकडे किंवा मालेगावकडून नाशिककडे जाणारी वाहने भरधाव वेगाने जात असतात. यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होऊन जीवितहानी होण्याचे प्रकार सुरु आहेत. हे टाळण्यासाठी या चौफुलीवर गतिरोधक आणि सिग्नल सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी टोल प्रशासन व पोलीसांकडे केली आहे.