One such hospital in Nashik was hit hard by social activist Jitendra Bhave

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच खाजगी रुग्णालयांकडून कोरोनाच्या नावाखाली लूट सुरु आहे. नाशिक मधील अशाच एका हॉस्पिटलला सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावेंनी चांगलाच दणका दिला आहे. अंगावरील कपडे काढून रुग्णालयाबाहेर त्यांनी अनोखं आंदोलन केले. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

    नाशिक : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच खाजगी रुग्णालयांकडून कोरोनाच्या नावाखाली लूट सुरु आहे. नाशिक मधील अशाच एका हॉस्पिटलला सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावेंनी चांगलाच दणका दिला आहे. अंगावरील कपडे काढून रुग्णालयाबाहेर त्यांनी अनोखं आंदोलन केले. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

    रुग्णाला भरती करताना नाशिकमधील या हॉस्पीटलने डिपॉजिट घेतले होते. हे पैसे परत मिळवण्यासाठी भावेंनी रुग्णाच्या नातेवाईकांसह स्वत: कपडे उतरले आणि कोरोनाच्या संकटातही सामान्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडे टाकणाऱ्यांना नग्न केलं. सामान्य माणूस कोरोनातून वाचलाच तर घरी जाताना मात्र असा उघडा नागडा केला जातोय. या आंदोलनामुळे हॉस्पीटल प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आणि ते पैसे देण्यास तयार झाले.