कांदा लिलाव ठप्प; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्याने बाजार समिती आवारात शुकशुकाट दिसत कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे. यामुळे कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्कीच.

    लासलगाव : मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यानिमिताने ७ दिवस आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्याने कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे.

    मार्चअखेर लाल कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल झाली. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आले असून, सर्वसाधारण ८०० ते ९०० रुपये कांद्याला बाजार भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसेच सात दिवस मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसा मिळणार नसल्याने लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार असल्याने बाजार समिती आवारात शुकशुकाट दिसत कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे. यामुळे कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्कीच.