कांदा दरात ४०० रुपयांची घसरण ; धाडसत्राने व्यापारीवर्गात खळबळ

लासलगाव : प्राप्तीकर विभागाने गुरूवारी कांदा निर्यातदारांवर छापे टाकताच कांद्याच्या भावात घसरण सुरू झाल्याने बळीराजा संतपाला आहे. कांदा दर पाच हजाराच्या पुढे जाताच प्राप्तीकरविभागाने व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. त्याचा परिणाम गुरूवारी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दिसायला मिळाला. येथे कांद्याच्या दरात सुमारेे ४०० रुपयांची घसरण झाली.

बेमाेसमी पाऊस, वादळी वारे यामुळे आधीच कांद्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. बाजारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाल्याने भाव पाच हजारांच्या पुढे गेले हाेते. कांदा दरात अजून वाढ हाेऊ नये, यासाठी प्राप्तीकर विभागाने लासलगाव येथील जवळपास ९ कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकत व्यवहारांची तपासणी केली. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत आज कांदा चारशे रुपयांनी घसरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता व्यापाऱ्यांमध्येही घबराट पसरल्याने येत्या काही दिवसांत कांदा दर अजून घसरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त हाेत आहे.

उरलीसुरली आशा मावळली
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांवर अनेक संकटांनी घाला घातला आहे. काेराेनामुळे लाॅकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात पाेहाेचू न शकल्याने त्यांचे माेठे नुकसान झाले. त्यानंतर बेमाेसमी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या पिकांची नासधूस केली. चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कांदा चाळषीत साठवून सांभाळला. मात्र आता चांगला भाव मिळताच धाडसत्राने डाेके वर काढले आणि कांदा दराला पुन्हा घसरण लागल्याने शेतकऱ्यांची उरलीसुरली आशाही मावळली अाहे.

बिहार निवडणुकीचा परिणाम
केंद्र सरकारने माेठा गाजावाज करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विधेयक आणल्याचे सांगितले. आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहाेत, असे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आमच्या मालाला भाव मिळू लागल्याबराेबर ते कमी कसे हाेतील, यासाठी उपाय शाेधले जात आहेत. केवळ बिहारच्या निवडणुकीत कांद्याचा मुद्दा तापू नये म्हणूनच हे केले जात असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.