Kanda-Utpadak-Shetkari-aandolan

सटाणा : प्राप्तीकर विभागाने धाडसत्र सुरु केल्याने कांदा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आजमितीला येथे कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम होऊन दोन दिवसात भाव कमी होण्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून मिळत आहेत.

सटाणा : प्राप्तीकर विभागाने धाडसत्र सुरु केल्याने कांदा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आजमितीला येथे कांद्याचे भाव स्थिर असले तरी प्राप्तीकरच्या भीतीने व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम होऊन दोन दिवसात भाव कमी होण्याचे संकेत व्यापाऱ्यांकडून मिळत आहेत.सटाणा व नामपूर बाजार समितीत कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोदामांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडल्या नसल्या तरी त्यांना मात्र धडकी भरली आहे.

गुरुवारी (दि.१५) सटाणा व नामपूर बाजार समिती आवारात सात ते आठ हजार क्विंटल इतकी कांदा आवक होती. तर सटाणा बाजार समिती आवारात कांद्याला सर्वाधिक भाव प्रती क्विंटल ५५०० रुपये तर सरासरी ४७०० ते ४८०० भाव होता .नामपूर मध्ये सर्वाधिक ५२०० रुपये तर सरासरी ४५०० ते ४६०० प्रती क्विंटल होते. प्राप्तीकर विभागाचे सर्वत्र धाड सत्र सुरु असले तरी आज कांद्याचे भाव मात्र स्थिर होते. एकंदरीत या धाड सत्रामुळे व्यापार्यासह शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीमुळे व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीवर मात्र परिणाम होणार आहे. कांदा खरेदी कमी झाल्यास त्याचे भावावर देखील परिमाण होतील, असे व्यापाऱ्यांनी संकेत दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या धाड सत्रामुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे.मागणीनुसार आज आम्ही कांदा खरेदी करत असून जाचक निर्बंध लादल्यास त्याचा आपोआपच खरेदीवर परिमाण होईल .खरेदी कमी झाल्यास त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात .त्यामुळे आमच्या बद्दल नाराजी तयार होते .त्यामुळे शासनाने कांदा खरेदी विक्री व्यवहारात अडथळे निर्माण होणार नाहीत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घ्यावी.

- श्रीधर कोठावदे, कांदा व्यापारी