bjp devendra fadanvis on eknath khadse allegations

मुक्ताईनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सतत अन्याय केला, अनेक वेळा मी याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र मला न्याय मिळत नसल्यानेच मला पक्षातून बाहेर पडावे लागल्याचे एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे बाेलताना सांगितले.

मुक्ताईनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ()यांनी माझ्यावर सतत अन्याय केला, अनेक वेळा मी याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र मला न्याय मिळत नसल्यानेच मला पक्षातून बाहेर पडावे लागल्याचे एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे बाेलताना सांगितले. माझ्याबराेबर १५ माजी आमदार असून, आम्ही सर्वच मुंबईकडे कूच करत आहाेत. काही आजी आमदारही आहेत मात्र त्यांना पक्षातरबंदी कायद्याची अडचण असल्याने ते आमच्यासाेबत आता येऊ शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर फार्महाऊसवर पत्रकारांशी गप्पा करताना नाथाभाऊंनी पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट केले. फडणवीसांनी वरिष्ठांकडे चुकीची बाजू मांडल्यानेच मला मनस्ताप सहन करावा लागला. मी आता एकच बाजू मांडत असल्याचे ते आता म्हणत आहेत मग मागची साडेचार वर्षे ते कुठे गेले हाेते? असा सवालही त्यांनी यावेळी बाेलताना उपसि्थत केला. गेल्या चार वर्षांपासून मी केवळ माझा गुन्हा काय ते सांगा, असे विचारत असताना मला काहीही सांगितले नाही. अाता काय सांगणार? असेही ते म्हणाले. मला न्याय मिळणार नाही, हे कळल्यानंतर मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि पक्षांतराचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीला या भागात नेता नाही म्हणून मी राष्ट्रवादीची निवड केली. मला शिवसेना आणि काॅंग्रेसनेही ऑफर दिली हाेती, असेही ते म्हणाले. आता तरी फडणवीस आत्मपरिक्षण करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ चंद्रकांत दादा पाटील यांनीच केवळ माझ्याशी संपर्क साधून असे न करण्याची गळ घातली हाेती, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना चांगले काम केले, असे ते म्हणतात. त्यावेळी युती हाेती. तरीही त्यांना पुन्हा सत्ता का आणता आली नाही, असा सवाल करून त्यांनी फडणवीसांना डिवचले. माझ्यासह चंद्रकांत बानवकुळे, प्रकाश मेहता यांची तिकीटे का कापली, याचे उत्तर अजूनही फडणवीसांना देता आले नाही, यातच सर्व काही आले. फडणवीसांनी माझ्यावर खाेटे गुन्हे दाखल करायला भाग पाडले. मी केवळ फडणवीसांच्या जाचाला कंटाळून पक्ष साेडला आहे. पक्षाच्या वाढीत आमचा थाेेडाफार वाटा असेल तर वरिष्ठांनी याचा विचार करायला हवा हाेता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.