आमचा कांदा; आमचा भाव ; कांदा उत्पादकांची माेहीम

केंद्र सरकार कांदा उत्पादकांकडे नेहमी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी केली अाहे. यावेळी नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समिती आवारात पदाधिकारी महेश ठाकरे, सोमनाथ गिते, विलास दौंड, रविंद्र पगार, गौरीलाल पाटील, सजन सानप, वाळीबा गायकवाड यांनी येऊन 'आपला कांदा, आपलाच भाव' या मोहिमेला सुरुवात केली.

  लासलगाव : केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणानुसार कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असताे. याचा फटका कांदा उत्पादकांना बसत असल्याने कांदा उत्पादकांचे नेहमीच वांदे होतात. कांदा उत्पादक हा आर्थिक संकटात सापडत असल्याने ‘आपला कांदा, आपलाच भाव’ या मोहिमेअंतर्गत कांद्याला किमान तीस रुपये किलोला हमीभाव मिळावा, यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लासलगाव बाजार समितीतून या अभियानाला आज सकाळी सुरुवात केली.

  ३० रुपये भाव द्या
  जोपर्यंत केंद्र सरकार कांद्याला ३० रुपये किलोला हमीभाव देत नाही तोपर्यंत राज्यासह संपूर्ण देशातून या मोहिमेअंतर्गत हा लढा असाच सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी कांदा उत्पादकांनी केला. यावेळी शेकडो कांदा उत्पादकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला.

  खर्चसुद्धा वसूल हाेत नाही
  खरीप (पोळ किंवा हळवा), लेट खरीप (रांगडा), आणि रब्बी (उन्हाळी किंवा गरवा) या तीन हंगामात कांद्याची लागवड केली जाते. प्रत्येक हंगामात कांद्याला एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो; मात्र उत्पादनात मोठी तफावत असते. बाजारभावाचा जर विचार केला तर कधी उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरीसुद्धा निघणे मुश्किल होते.

  मोहिमेला प्रारंभ
  केंद्र सरकार कांदा उत्पादकांकडे नेहमी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी केली अाहे. यावेळी नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समिती आवारात पदाधिकारी महेश ठाकरे, सोमनाथ गिते, विलास दौंड, रविंद्र पगार, गौरीलाल पाटील, सजन सानप, वाळीबा गायकवाड यांनी येऊन ‘आपला कांदा, आपलाच भाव’ या मोहिमेला सुरुवात केली.

  …ताेपर्यंत लढा देणार
  वर्षभर चांगली मागणी असणाऱ्या कांदा पिकासाठी येणारा उत्पादन खर्च विचारात घेऊन कांद्यास प्रति किलो किमान ३० रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा या जनजागृतीपर अभियानात ठेवत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत केंद्र सरकार कांद्याला तीस रुपये हमीभाव देणार नाही. तोपर्यंत असाच लढा या मोहिमेअंतर्गत सुरू ठेवण्याचा निर्धार शेकडो कांदा उत्पादकांनी घोषणा देत केला