गोविंदनगराला काेराेनाचा उद्रेक; परिसर सील

गोविंद नगर परिसरात सत्यम स्वीट परिसरातील तीन अपार्टमेंटमध्ये २४ नागरिक बाधित रुग्ण आढळून आले असून, परिसरातील आपारमेंटचा भाग महापालिकेच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांना १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    सिडको : गोविंद नगर परिसरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा झपाट्याने वाढला असून दोन दिवसात गोविंदनगरमध्ये चोवीस नागरिक बाधित असून, या परिसरातील इमारतीसह इतर परिसर प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आला आहे.

    गोविंद नगर परिसर गेली दहा ते बारा दिवसापासून सातत्याने कोरोना चा संसर्ग वाढत असून दोन दिवसांमध्ये या भागात चोवीस रुग्ण बाधित आढळले असून यापैकी तीन रुग्ण बरे झाले आहे. दरम्यान या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून अाल्याची अशी अफवा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन सिडकोचे नोडल अधिकारी डॉ. नवीन बाजी केले आहे.

    गोविंद नगर परिसरात सत्यम स्वीट परिसरातील तीन अपार्टमेंटमध्ये २४ नागरिक बाधित रुग्ण आढळून आले असून, परिसरातील आपारमेंटचा भाग महापालिकेच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांना १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    दरम्यान, या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले अशी अफवा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व करोणाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.