देवळा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, १२५ रुग्णांवर उपचार सुरू

डॉ. मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १४ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत तालुक्यात १२५६ कोरोना रुग्ण आढळून आले असून ११०४ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १२५ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील २७ रुग्णांचा दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १२५ रुग्णांनापैकी डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल्स (DCH) येथे ४ रुग्ण उपचार घेत असून, ११८ गृह विलगिकरनात असून घरीच उपचार घेत आहेत.

    देवळा : देवळा शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसून येत असून, तब्बल १२५ रुग्णांवर सद्या उपचार सुरू असून दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

    डॉ. मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १४ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत तालुक्यात १२५६ कोरोना रुग्ण आढळून आले असून ११०४ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर १२५ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील २७ रुग्णांचा दुर्दैवाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १२५ रुग्णांनापैकी डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल्स (DCH) येथे ४ रुग्ण उपचार घेत असून, ११८ गृह विलगिकरनात असून घरीच उपचार घेत आहेत.

    तालुक्यात रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आदिवासी मुलांचे वसतिगृह खर्डा रोड, देवळा येथे पुनःश्च कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जोमाने वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. मास्कचा वापर करावा, गर्दीचा ठिकाणी जाणे टाळावे ,वारंवार हात स्वच्छ धुवावे , सॅनिटायजर चा वापर करावा कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे यांनी केले आहे.

    रविवारचा आठवडे बाजार बंद

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देवळा येथील रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रविवार बंद आणि इतर दिवशी सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत चालू राहतील असा निर्णय देवळा नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. तशा आशयाचे पत्रक विक्रेत्यांपर्यंत पोहोच करण्यात आले आहे. याशिवाय १५ मार्चपासून लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम घेतांना मर्यादीत संख्या आणि नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवार धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील. याशिवाय सर्व प्रकारची राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम उत्सव व समारंभ पूर्णपणे बंद राहतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. देवळा शहरासह तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्याने हा तातडीचा निर्णय घेण्यात आला. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आढळल्यास शिक्षेस पात्र राहील अशी माहिती मुख्यधिकारी संदीप भोळे यांनी दिली.