पंचवटीत पल्लवी बार पाठोपाठ न्यू पंजाब बार व रेस्टारंटला सील तर,महाराणा बारला पाच हजाराचा दंड

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असतांना प्रशासनाने नियम कठोर केले आहेत.कोरोना आजाराचा प्रादृर्भावा रोखण्यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहिर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने दररोज सायंकाळी आठ वाजेच्या आत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दर शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व प्रकारचे दुकाने दिवसभरात पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

  • मनपा व पोलीस पथकाकडून धडक कारवाई
  • परिसरात खळबळ

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंट व बार यांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश आहेत.परंतु एकदा दंडात्मक कारवाई करून ही नियमाचे पालन न करणाऱ्या पल्लवी बार रविवार (ता.२८) रोजी सील करण्यात आला. दिंडोरी रोडवरील महाराणा रेस्टॉरंट व बार वर पाच हजार रुपये दंड करण्यात आला.तसेच सोमवार दिनांक-२९ रोजी सायंकाळी पंचवटी-मालेगाव स्टॅण्ड येथील न्यू पंजाब बार व रेस्टारंटला नोटीस देऊन सील करण्यात आले..सदर कारवाई पंचवटी विभागीय कार्यालय व पंचवटी पोलिस पथकाने कारवाई केली.यामुळे परिसरात खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असतांना प्रशासनाने नियम कठोर केले आहेत.कोरोना आजाराचा प्रादृर्भावा रोखण्यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहिर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने दररोज सायंकाळी आठ वाजेच्या आत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दर शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व प्रकारचे दुकाने दिवसभरात पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही लॉकडाऊन दरम्यान काही दुकाने चालू असल्याचे दिसून येत असल्याने मनपा व पोलीस पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

विशेषतः दुकानांमध्ये गर्दी होऊन शासकीय नियमांचे उल्लंघन होऊन कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळे शनिवार व रविवार तसेच इतरही दिवशी मनपा पथक व पंचवटी पोलिस संयुक्त विद्यमाने कारवाई दररोज सुरू आहे. या दरम्यान पंचवटीतील नवीन आडगाव येथील पल्लवी बारला काही दिवसांपूर्वी वेळेत बंद करण्याची ताकीद देत पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.परंतु रविवार (ता.२८) रोजी पुन्हा एकदा शासनाच्या नियमाचे उल्लघन करीत पल्लवी बार वेळेत बंद केले नाही.

हे दंडात्मक करणारे पंचवटी विभागीय कार्यालय व पंचवटी पोलिस पथकाने प्रत्यक्ष बघताच जुना आडगांवनाका भागातील पल्लवी बार सील केले. तसेच दिंडोरी रोडवरील मेरीलगतचे महाराणा बारवर दंडात्मक कारवाई करतांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला. याशिवाय सोमवार दि- २९ रोजी पंचवटी मालेगाव स्टॅण्ड येथील न्यू पंजाब बार व रेस्टारंट मनपा व पोलीस पथकाकडून नोटीस देऊन बार व रेस्टारंट सील करण्यात आले.

सदर कारवाई ही सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत,पोलीस उपनिरीक्षक संदीप चोपडे, मनपाचे मूख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन,पंचवटी विभागीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विवेक धांडे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पोलीस व मनपाचे पथक प्रमुख सर्वश्री सहायक अधीक्षक भूषण देशमुख,राजेंद्र सोनवणे,प्रकाश उखाडे, दिपक मिंधे,रमेश गायकवाड,विजय हिरे,जना गांगुर्डे,सचिन गवळी,पोलिस नाईक धनराज पाटील यांनी दंडात्मक कारवाई केली.यापुढे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.