पिंपळगाव बसवंतला रुग्णांची ससेहोलपट, कोविड सेंटरमध्ये समस्यांची महामारी

स्वॅब घेताना गर्दी होणार नाही याची काळजी आरोग्य प्रशासनाने घेण्याची विनंती करण्यात आली आहे. इतर सर्व सुविधा चांगल्या असून, पेशंटने कोविड सेंटर खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. परिसर स्वच्छ ठेऊन सहकार्य करावे, असेही रूग्णांनी म्हटले आहे.

पिंपळगाव : येथील जोपूळ रोडवरील कोविड सेंटरमधील रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रूग्णांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
पिंपळगाव बसवंत येथील कोविड सेंटरमधील ( Covid Center) शौचालयात चोवीस तास पाणीच नसल्याचे एका रूग्णाने सांगितले. शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, (Epidemic of problems) दिवसातून दोन वेळा शौचालय स्वच्छ करण्यात यावे, अशी मागणी देखील रूग्णांनी केली आहे. कोविड रुग्णांची रूम दररोज साफ करावी, असेही रूग्ण सांगतात.