मुंबईतील पावसामुळे पंचवटी एक्सप्रेसला लागला ब्रेक

नाशिक: मुंबईतील जोरदार पावसामुळे(heavy rain in mumbai) आज पंचवटी एक्सप्रेस रद्द(panchwati express cancelled) करण्यात आली. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना मुंबईला जाता आले नाही. लॉकडाउनमुळे पंचवटी पाच महिने बंद होती. ती नुकतीच सुरु झाली होती. तिला प्रतिसाद कमी मिळत आहे. मात्र पावसामुळे आज पंचवटी एक्सप्रेस निघालीच नाही.

गेल्या २ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यामुळे आज मुंबईतील लोकल सेवा तसेच सरकारी कार्यालयेदेखील बंद होती. तसेच पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गावरसुद्धा पाणी साचलेले आहे. पावसाची जोरदार हजेरी सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून पंचवटी रद्द करण्यात आली. कसाऱ्याहूनदेखील लोकल नसल्यामुळे मुंबईला अप-डाऊन करणाऱ्या नाशिककरांना घरीच थांबावे लागले.