पानवेलींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ; प्रभाग बैठकीत मच्छरदाणी लावून आंदोलन

प्रभाग  समितीची सभा आज सभापती जयश्री खर्जुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग १८ च्या नगरसेिवका मीरा हांडगे यांनी हे आंदोलन केले. जाेपर्यंतत अधिकारी येथे येऊन पानवेली कधी काढणार? याचे आश्वासन देत नाही ताेपर्यंत मच्छरदाणीतून बाहेर येणार नाही, असा पवित्रा नगरसेिवका हांडगे यांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

    नाशिकराेड : दसक पंचक परिसरातील गाेदावरील नदीमध्ये पानवेली वाढल्याने परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांत आजारांचे प्रमाण वाढले असल्याने प्रशासनाला वारंवार सांगूनही लक्ष दिले जात नसल्याने भाजपा नगरसेिवका मीरा हांडगे यांनी चक्क सभागृहात मच्छरदाणी लावून आंदोलन केले.

    …तर पानवेलीत आंदोलन
    प्रभाग  समितीची सभा आज सभापती जयश्री खर्जुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग १८ च्या नगरसेिवका मीरा हांडगे यांनी हे आंदोलन केले. जाेपर्यंतत अधिकारी येथे येऊन पानवेली कधी काढणार? याचे आश्वासन देत नाही ताेपर्यंत मच्छरदाणीतून बाहेर येणार नाही, असा पवित्रा नगरसेिवका हांडगे यांनी घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. दरम्यान, येत्या साेमवारी पानवेली काढायला प्रारंभ करणार असल्याचे आश्वासन विभागीय अधिकारी डाॅ. दिलीप मेनकर यांच्याकडून मिळाल्यानंतर मीरा हांडगे यांनी आंदाेलन मागे घेतले. मात्र साेमवारी पानवेली काढल्या नाहीत तर पानवेलीमध्येच आंदाेलन करेल, असा इशाराही विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.

    मास्क नसेल तर कारवाई करा
    नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी मनपा विभागीय कार्यालयात व नवीन बिटको रुग्णालयांमध्ये जी व्यक्ती येईल त्याने मास घातला असेल तरच तरच प्रवेश देण्यात यावा तसेच मनपाचे काही अधिकारी व कर्मचारी मास वापरत नाहीत; त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी  केली. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर धनेश्वर यांनी उत्तम काम केलं तसेच असते यांचा वाढदिवस असल्याने सभागृहांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी  झालेल्या सभेमध्ये फक्त पाच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सभापती जयश्री खर्जुल विभागीय अधिकारी डॉ. दिलीप  मेनकर, नगरसेवक जगदीश पवार, सूर्यकांत लवटे, पंडित आवारे, नगरसेविका मीरा हांडगे, ज्योती खोले तसेच अधिकारी उपस्थित होते.