lockdown

१० तारखेपासून जिल्ह्यात सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुधपुरवठा धारक, वर्तमानपत्र विक्रेते यांचा अपवाद राहणार आहे. शनिवार, रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद असतील. जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरते वापरता येतील. हॉटेल, परमिट रुम, बार यांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहतील. सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय बंद राहतील. सर्व दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद असतील.

  गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रशासनाच्या आवाहनाला नागरिक केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अंशतः लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनाने घेतला असून उद्यापासून (१० मार्च) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

  १० तारखेपासून जिल्ह्यात सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुधपुरवठा धारक, वर्तमानपत्र विक्रेते यांचा अपवाद राहणार आहे. शनिवार, रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद असतील. जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरते वापरता येतील. हॉटेल, परमिट रुम, बार यांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहतील. सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय बंद राहतील. सर्व दुकाने सायंकाळी ७ नंतर बंद असतील.

  हे आहेत महत्त्वाचे निर्णय

  ▪️जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरते. स्पर्धा, गर्दी बंदी.

  ▪️कॉलेज कोचिंग क्लासेस बंद राहतील.

  ▪️पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला येऊ शकतील

  ▪️परीक्षा राज्य किंवा राष्ट्रीय परीक्षा पूर्वघोषित असल्यामुळे त्या नियोजानुसार पार पडतील.

  ▪️नाशिक,नांदगाव, निफाड आणि मालेगाव मधील शाळा बंद राहतील.

  ▪️आठवडी बाजार बंद राहतील.

  ▪️१५ मार्चनंतर लग्नसमारंभासाठी परवानगी मिळणार नाही, विशेष परवानगीने नव्या मर्यादांसह सोहळा करावा लागेल.

  ▪️१५ मार्च नंतर घरगुती पद्धतीने हे कार्यक्रम होतील.

  ▪️हॉटेल, बार, परमिटरूम सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत अर्ध्या क्षमतेने सुरु राहतील.

  ▪️धार्मिक समारंभ बंद करण्यात येतील.

  ▪️धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु राहतील.

  ▪️शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील.

  ▪️भाजी मंडई ५० टक्के उपस्थितीत सुरु राहील.