पोलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी

कोरोनाची दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे. यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले. मात्र याचा फायदा घेत पर्यटक पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी करत आहे. यावेळी पर्यटक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत नाहीत.

    इगतपुरी : गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील पर्यटनस्थळांवर नागरिक गर्दी हाेत हाेती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच अशा गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने गर्दी कमी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले हाेते. मात्र परिसरात असलेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी कमी हाेत नव्हती. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटनस्थळी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. पिंपरीगेट येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असून, पिंपरी गेटपासून एक किलोमीटर परिसरामध्ये वाहनांना बंदीही घालण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पर्यटनस्थळी पोलिसांचा चोख बंदाेबस्त ठेवण्यात आला होता.

    कोरोनाची दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे. यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले. मात्र याचा फायदा घेत पर्यटक पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी करत आहे. यावेळी पर्यटक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत नाहीत. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नसते. हा निष्काळजीपणाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरु शकते. यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत इगतपुरीतील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू केले आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. एल. डिवटे, पोलिस उपनिरिक्षक दीपक पाटील व पाेिलस पथकांचा ठिकठिकाणी कडक बंदाेबस्त होता.

    भावली डॅम, रेल्वे तलाव, नगरपरिषद तलाव, दारणा डॅम, वाकी धरण, कसारा घाट, घाटनदेवी मंदिर परिसर, तसेच तालुक्यातील किल्ले परिसरामध्ये जमावबंदी केली आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि पोहण्यासही बंदी घालण्यात आली आहे.तसेच धबधब्याखाली उभे राहणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी येणे अशा गोष्टींना येथे बंदी केली आहे.

    - समाधान नागरे, पोलीस निरिक्षक