पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांची पोलिसांकडून धिंड

कायदा हातात घेत पोलिसांनावर दगड फेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ७ संशयितांची पोलिस बंदोबस्तात देवळाली कॅम्प शहरत धिंड काढण्यात आली.शुक्रवार (दि. १९) रोजी शिवजयंती दिवशी शिवजयंतीचा कार्यक्रम रात्री पार पडल्यानंतर चारणवाडीतील समाजकंटकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली.

    देवळाली कॅम्प : कायदा हातात घेत पोलिसांनावर दगड फेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ७ संशयितांची पोलिस बंदोबस्तात देवळाली कॅम्प शहरत धिंड काढण्यात आली.शुक्रवार (दि. १९) रोजी शिवजयंती दिवशी शिवजयंतीचा कार्यक्रम रात्री पार पडल्यानंतर चारणवाडीतील समाजकंटकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली. ती पांगविण्यासाठी गेलेल्या पोलीस मनोहर साळुंखे, पंढरीनाथ आहेर, राजेंद्र मोजाड, स्वप्नील जुंद्रे या पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यात पोलीस शिपाई मनोहर साहेबराव साळुंखे व पोलीस नाईक पंढरीनाथ सोपान आहेर हे दोन पोलीस गंभीर जखमी झाले. या घटनेची पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

    त्यानुसार आज पोलिसांनी पोलीस ठाण्यातून कडक बंदोबस्तात सात आरोपींची देवळाली शहरातील पोलीस ठाण्यापासून मिठाई स्ट्रीट रोड मार्गे जुना बस स्टॉप, झेंडा चौक मार्गे लेव्हीत मार्केट शहरातील विविध ठिकाणी समाजकंटकांचे धिंड मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांना ज्याठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाली. त्याची माहिती सविस्तरपणे घेतली व या समाजकंटकांसारखी पुन्हा प्रवृत्ती होऊ नये. यासाठी धिंड काढून जर कायदा हातात घ्याल तर याद राखा, असे संदेश जणू संदेश पोलीस प्रशासन समाजात देत असून एकूण १४ आरोपींपैकी सात आरोपींची धिंड काढण्यात आली उर्वरित बाकी ७ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक नेमून त्यांना लवकरच अटक करण्यात पोलिसांना यश येईल तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिस कायम कटिबद्ध असून त्याला गालबोट लावण्याचे गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यात येईल यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

    या धिंडप्रसंगी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, मेहबूब सय्यद, स्वप्नील जुंद्रे, राजेंद्र मोजाड बाबा शेख, श्याम आहेर ,सुनील डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा कांडेकर यांच्यासह देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.