नाशिक जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान ; १९५२ मतदान केंद्र , ४२२९ जागा

नाशिक : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. निवडणूक शाखेकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.१ हजार ९५२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून तब्बल १२ लाख ८४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार अाहे.

नाशिक : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. निवडणूक शाखेकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.१ हजार ९५२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून तब्बल १२ लाख ८४ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार अाहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमुळे ऐन थंडीत जिल्ह्यात राजकीय धुराडा उडाला होता. सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याने वातावरण तापले होते. ६२१ ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्राम पंचायत बिनविरोध झाल्या. तर उमराणे ग्रामपंचायत निवडणूक दोन कोटीच्या बोली प्रकरणी निवडणूक आयोगाने रद्द केली. त्यामुळे आता ५६६ ग्राम पंचायतींसाठी आज सकाळि ७.३० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.

अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराचा धुराडा उडाला होता. उमेदवार मते मिळवण्यासाठी मतदारांच्या घरी पिंगा घालत होते. पार्टयांना उधाण आले होते. प्रचाराच्या तोफा बुधवारी (दि.१३) थंडावल्या. आज ५६६ ग्रामपंचायतीच्या ४ हजार २२९ जागांसाठी मतदान होणार असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटित बंद होणार आहे. संवेदनशील ग्रामपंचायतीची संख्या ४४ तर अतिसंवेदनशील ग्रामपंचायतींची संख्या आठ इतकी आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार – ११०५६ एकूण मतदार – १२ लाख ८४ हजार १०९निवडणूक निर्णय अधिकारी – ३८९ मतदान केंद्र कर्मचारी – ९७६० निवडणूक निरिक्षक – ६मतदान यंत्रे – ५१२०