येवला तालुक्यात मतदान शांततेत सुरू ; मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

येवला : तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७:३० मतदानाला सुरवात झाली असून मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या आहे तालुक्यात किरकोळ ठिकाणी अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे कोरोना साथीच्या काळात कोरोना पासून बचाव करण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहे

येवला : तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७:३० मतदानाला सुरवात झाली असून मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या आहे तालुक्यात किरकोळ ठिकाणी अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे कोरोना साथीच्या काळात कोरोना पासून बचाव करण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या असून पहिल्या दोन तासातच विक्रमी मतदान होऊ शकते मतदानासाठी आलेल्या मतदारांनी सुद्दा कोरोना पासून बचावासाठी मास्क वापरलेले किरकोळ प्रमाणात आढळून आले येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

मालेगावातील ९६ ग्रापंसाठी चार तासात २९ टक्के मतदान
मालेगाव : राज्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दि.१५ रोजी मतदान प्रक्रिया राबविली जात असून मालेगावातील ९६ ग्रामपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी ७:३० ते ११:३० या चार तासांच्या कालावधीत २८.८३ टक्के इतके मतदान झाले आहे.एकूण २ लाख ९ हजार २३१ मतदार संख्येपैकी ६० हजार २५४ मतदारांनी आत्ता पर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला असून यात २६ हजार १२८ महिला व ३४ हजार १२६ पुरुष मतदारांचा समावेश आहे.