The counting will continue till late at night

मालेगाव : तहसिलदारांनी केलेल्या प्रयत्नातून मालेगाव तालुक्यातील बोधे येथील मतदारांना आपले हक्काचे मतदान केंद्र मिळाल्याने बोधे गावातील मतदारांना दिलासा मिळाला आहे. यामुळे गावातील मतदारांची होणारी गैरसोय टाळण्याचा एक छोटासा प्रयत्न केल्याचे तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी सांगितले.

मालेगाव : तहसिलदारांनी केलेल्या प्रयत्नातून मालेगाव तालुक्यातील बोधे येथील मतदारांना आपले हक्काचे मतदान केंद्र मिळाल्याने बोधे गावातील मतदारांना दिलासा मिळाला आहे. यामुळे गावातील मतदारांची होणारी गैरसोय टाळण्याचा एक छोटासा प्रयत्न केल्याचे तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी सांगितले.

तालुक्यातील दहीवाळ बोधे या ग्रुप ग्रामपंचायतीमधील बोधे गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी ३ ते ४ किमी पायपीट करावी लागत होती. आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी बोधे येथे स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करून मतदारांना दिलासा दिला आहे. यामुळे बोधे गावातील मतदारांना आता गावातच आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळापासून तालुक्यातील दहीवाळ बोधे या ग्रुप ग्रामपंचायतीमधील बोधे व सिताणे येथील मतदार यादी विभाग एकत्रित असल्याने बोधे गावातील मतदारांना आपला लोकसभा व विधानसभा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सिताने गावातील मतदार केंद्रावर जावे लागत होते. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी दहीवाळ येथे जावे लागत होते. सदर बाब तहसिलदार राजपूत यांच्या निदर्शनास आल्यानंतर राजपूत यांनी बोधे गावातच स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण केल्याने ५४० लोकसंख्या असलेल्या बोधे गावातील ३११ मतदारांचा मतदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत बोधे गावतील हिरालाल बंडु नरवाडे, अनिल कारभारी वाघ, तसेच सखुबाई शांताराम सोनवणे हे तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. पैकी हिरालाल नरवाडे व अनिल वाघ हे बिनविरोध निवडून आले असून उर्वरित एका जागेसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी बोधे गावातच मतदान केंद्र सुरू करण्यात आले असून सदर मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्याचे नियोजनात असल्याचे तहसिलदार राजपूत यांनी सांगितले.