सकारात्मक बातमी! डाॅक्टरांची अशीही रुग्णसेवा ; रुग्णासाठी स्वतः केला प्लाज्मा दान

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना कधी व्हेंटिलेटर, कधी ऑक्सिजन, कधी रेमडिसिव्हीर तर कधी प्लाझ्मा देण्याची वेळ पडत आहे. सध्याच्या वातावरणात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडिसिव्हीरसाठी रांगाच रांगा दिसत आहे.

    नाशिक : कोरोनाच्या या वातावरणात एकीकडे संपूर्ण जग कोलमडून पडत आहे. सर्व रस्ते, दुकाने, मंदिरे बंद आहेत. मात्र, या वातावरणात देव डॉक्टरांच्या रुपात जनसेवा करायला आला असल्याचा अनुभव म्हसरूळच्या कोरोनाबधित अशोक दुसाने यांना आला.आजमितीला देवळाची दारे बंद आहेत तर डाॅक्टरांची दारे खुली आहेत. आज डाॅक्टर हाच सर्वसामान्यांसाठी देव बनून पुढे आला आहे. काही ठिकाणी डाॅक्टरांवर अनेक आराेप हाेत आहेत. परंतु डाॅक्टरांमधील देवही अजून जागा असल्याची प्रचिती काेराेनाबाधितालाच आल्याने काेराेनाबाधित रुग्णांनाही डाॅ. नीलेश कुंभारे यांनी दाखवलेल्या माणुसकीचा निशि्चतच दिलासा मिळण्यास मदत हाेईल.

    जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना कधी व्हेंटिलेटर, कधी ऑक्सिजन, कधी रेमडिसिव्हीर तर कधी प्लाझ्मा देण्याची वेळ पडत आहे. सध्याच्या वातावरणात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडिसिव्हीरसाठी रांगाच रांगा दिसत आहे. कितीही पैसे घ्या पण आम्हाला बेड, इंजेक्शन उपलब्ध करून द्या, अशी आर्त विनवणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात असल्याचे विदारक चित्र बघायला मिळते आहे. अशश बिकट परिसि्थतीत म्हसरूळ येथील अशोक दुसाने हे कोरोनाबधित झाले. त्यांच्यावर डॉ. निलेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. उपचारदारम्यान रुग्ण दुसाने यांना प्लाझ्माची आवश्यकता भासली. सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलमहाले ७ ते ८ दिवस सतत शहरभर फिरले; मात्र तरीही प्लाझ्मा उपलब्ध झाला नसल्याचे लक्षात आले. डॉ. कुंभारे यांनी स्वतःच्या अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असल्याने लगेच रुग्णाला दिल्या आणि वैद्यकीय धर्माची प्रचिती करून दिली.
    डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना शपथ दिली जाते की ‘कुठल्याही रुग्णाचे मी कधीच अहित करणार नाही आणि वेळ प्रसंगी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा करणार नाही.’ या प्रतिज्ञेला जागून डॉ.कुंभारे यांनी रुग्णाचे प्राण वाचविले. परिसरातील सर्वांकडून सोशल मीडियावर डॉ.कुंभारे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.