सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांचा लिलाव, उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलकडे सत्ता

ग्रामदैवत रामेश्वर महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचा लिलाव बोलीने उमराने गाव राज्यात गाजले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. व दि. १२ रोजी ही निवडणूक पार पडली यात ८१.९२ टक्के मतदान झाले. एकूण ८ हजार ९४८ पैकी ७ हजार ३६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

  देवळा : सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांच्या लिलाव बोलीने राज्यात गाजलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील श्री. रामेश्वर विकास पॅनलला १७ पैकी १६ जागा मिळाल्या असून उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.

  ग्रामदैवत रामेश्वर महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचा लिलाव बोलीने उमराने गाव राज्यात गाजले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. व दि. १२ रोजी ही निवडणूक पार पडली यात ८१.९२ टक्के मतदान झाले. एकूण ८ हजार ९४८ पैकी ७ हजार ३६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

  रात्री आठ वाजता मतमोजणी होऊन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १६ जागांवर विजय संपादन केला तर माजी सभापती विलास काका देवरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मवीर ग्यानदेव दादा देवरे पॅनलला एक जागा मिळाली. शेवटी मतदारांनी रामेश्वर महाराज मंदिराच्या मुद्द्यालाच मतदान करून सत्तापरिवर्तन घडवून आणल्याचे चित्र निकलाअंती दिसून आले.

  श्री. रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी

  वॉर्ड १-
  विष्णू गंगाराम सोनवणे ( ५२९ मते),
  रंजना कडू पवार( ६९४ मते),
  भरत काशिनाथ देवरे(६७६ मते),

  वॉर्ड २-
  सचिन रामदास देवरे ( ९०२ मते),
  सीमा कैलास गोधडे( ८३५ मते),
  विमल भाऊसाहेब देवरे( ७७३ मते),

  वॉर्ड ३-
  प्रशांत विश्वास देवरे( ६८७ मते),
  वंदना कैलास देवरे( ६१० मते),

  वॉर्ड ४-
  छाया संदीप देवरे( ९५९ मते),
  सुषमा अनिल देवरे(८२८ मते),
  बापू पुंडलिक जमधाडे ( ८७३ मते),

  वॉर्ड ५-
  विश्वनाथ सीताराम देवरे( ६४१ मते),
  स्मिता ललित देवरे( ६५३ मते),

  वॉर्ड ६-
  प्रशांत (बंडूकाका)जगन्नाथ देवरे (८३५ मते),
  रेखा सचिन जाधव( ९०१ मते),
  कमल विश्वासराव देवरे( ९७७ मते)

  तर वॉर्ड क्रमांक पाच मधून कर्मवीर ग्यानदेव दादा देवरे पॅनलचे नेते विलास काका देवरे (६४७ मते) हे एकमेव निवडून आले. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.