कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रभाकर मुळाणे बिनविराेध

उपसभापतीपदासाठी प्रभाकर मुळाणे यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सचिव अरुण काळे, सहायक सचिव आर. एन. घोलप व एन. एल. बागूल, एम. एम. निकाळे, वाय. पी. खरात उपस्थित होते. तसेच आमदार हिरामण खोसकर व बहिरू मुळाणे आदी उपस्थित होते.

  म्हसरूळ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रभाकर मुळाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे ताराबाई माळेकर यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. शुक्रवार (ता. ११) सकाळी ११ वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसभापतीपदी प्रभाकर मुळाणे, यांनी दिली.

  यांची उपस्थिती
  सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार (ता. ११) सकाळी साडे दहा वाजता सभापती देविदास पिंगळे यांच्यासह प्रभाकर मुळाणे, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, रवींद्र भोये,जगदीश अपसुंदे, चंद्रकांत निकम, संदीप पाटील, ताराबाई माळेकर, विमल जुंद्रे, हे संचालक बाजार समितीमध्ये दाखल झाले.

  एकमेव अर्ज
  उपसभापतीपदासाठी प्रभाकर मुळाणे यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सचिव अरुण काळे, सहायक सचिव आर. एन. घोलप व एन. एल. बागूल, एम. एम. निकाळे, वाय. पी. खरात उपस्थित होते. तसेच आमदार हिरामण खोसकर व बहिरू मुळाणे आदी उपस्थित होते.

  सभापती देविदास पिंगळे व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत उपसभापतीपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजवर शेतकरी हिताचीच कामे करीत आलो. यापुढेही ही कामे करीत राहील. संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.

  - प्रभाकर मुळाणे, उपसभापती