शेतकऱ्यांसाठी संघर्षाची तयारी ठेवा : आ. माणिकराव कोकाटे

भारत बंदपूर्वीच सिन्नरला शेतकरी आले रस्त्यावर

सिन्नर : शेतकरी अाणि सामान्य जनतेचे हित साधण्यासाठी शांत बसून चालणार नाही, अशी भूमिका सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी येथील आडवा फाटा भागातून बैलगाडीत बसून आ. कोकाटे मोर्चाने तहसील कार्यालयाकडे गेले.

-उद्याेगपतीधार्जिणे धाेरण
यावेळी आमदार कोकाटे म्हणाले की सरकारचा आदेश येईल त्यावेळी येईल. परंतु आता शांत बसणे शक्य नाही. शेतकरी देशोधडीला जात असताना आपण कुणीही घरात बसता कामा नये. उद्या संपूर्ण भारत बंद आहे. त्या आदेशानुसार उद्या पण बंद पाळणार आहोतच. आजचा कार्यक्रम ही उद्याची झलक आहे. उद्याेगपतीधार्जिण्या धाेरणाला िवराेधाची हीच वेळ अाहे.

-...तर इथून पुढे चढाई
सध्याचा मोर्चा हा प्राथमिक मोर्चा असून पुढच्या मोर्चा दिल्लीला न्यायचा आहे. दिल्लीकडे जायची तयारी आहे का? असे आमदार कोकाटे यांनी विचारतात शेतकऱ्यांनी हात वर करून होकार दर्शविला.

-शेतकऱ्यांना चाेवीस तास वीज
शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही, परंतु इंडिया बुलचा प्रकल्प चालू झाल्यावर परिसरातील वीस किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळेल असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जि. प. सदस्या सिमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे आदींची यावेळी भाषणे झाली.