कांद्याने केला वांदा; मिरचीने आणला ठसका

  राजेंद्र शेलार
  येवला (वा.) गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला कवडीमाेल भाव मिळत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आ हे. गेल्या आ ठवड्यात शेतकऱ्यांनी टाेमॅटाे रस्त्यावर तून आ पला राग व्यक्त केला तर कांद्यालाही भाव नसल्याने कांदा उत्पादकही अडचणीत आले आहेत. त्यात मिरचीच्या दरानेही आता घसरण सुरू केल्याने उरलीसुरली आशाही लाेप पावत चालली आहे. त्यामुळे दाेन वर्षांपासून या ना त्या संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजापुढची ही संकटांची मािलका सुरूच आ हे. आधीचेच कर्ज अजून फिटलेले नाही, त्यात आ ता या नवीन आ र्थिक संकटाची भर पडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

  कांद्याने रडवले
  जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्यासह इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, बाजारभाव मात्र दिवसेंदिवस घसरत असल्याने शेतकरी वर्गात मोठी निराशा आहे. गतवर्षी अनेक संकटाना सामोरे जात उन्हातान्हात राबत एकरी हजारो रुपयांची गुंतवणूक करून उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले. कोरोनामुळे सर्वच बाजरापेठा बंद असल्याने मिळेल त्या भावात कांद्याची विक्री करावी लागली होती. अनेक शेतकऱ्यांनी वाढता तोटा लक्षात घेता कांदा साठवणूकीला प्राधान्य दिले होते. काही महिन्यानंतर भाव वाढतील अन‌् चार पैसे जास्तीचे हातात पडतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र कांद्याने पाणी आणले आहे. कांदा साठवणुकीच्या वेळी कांद्याचा भाव सरासरी २ हजार रुपये प्रतिक्विंटल होता आज मात्र तोच कांदा १२०० ते १५०० रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे चार महिने कांदा चाळीत असल्याने वजन तर कमी झालेच शिवाय भावही कमी मिळाल्याने साठवलेल्या कांद्याने शेतकऱ्यांचा वांधा केला आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कांद्याची आवक कमी होऊन भाव वाढतात असा अनुभव असल्याने या महिन्यात तरी भाववाढ होईल अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र आवक कमी होऊनही भावात मात्र १५० ते २०० रुपयांची घसरण झालेली पहायला मिळाली.

  टाेेमटाे, मिरची काकडीही संकटात
  जी अवस्था कांद्याची झाली तीच अवस्था इतर भाजीपाला वर्गीय पिकांची झाली उन्हाळ्याच्या मध्यावर टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, काकडी यांची रोपे टाकून जूनच्या सुरवातीला मोठ्या अपेक्षा ठेऊन लागवड केली. दरवर्षी टोमॅटो चांगल्या भावात विकत असल्याने यावर्षीही भाव असेल या अपेक्षेवर मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. मात्र पीक हाती येण्याच्या काळातच भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. टोमॅटोच्या उत्पन्नातून वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली किंवा संतापात टोमॅटो बाजार समितीच्या बाहेत रस्त्यावर फेकून आपली उद्विग्नता व्यक्ती केली.

  लासलगाव, पिंपळगाव, येवला यांसह विविध बाजार समित्याचे आवार फुल्ल होऊन रस्त्यावरही गाड्या उभ्या राहू लागल्या. सुरूवातीला २०० रुपये प्रती कॅरेट जाणारा टाेमॅटाे आज ३० रुपयांनी सूद्धा घ्यायला कुणी तयार नाही. जी अवस्था टोमॅटोची तीच अवस्था मिरचीचीही झाली गतवर्षी ज्या मिरचीने शेतकऱ्यांना लखपती केले. त्याच मिरीचीने यंदा मात्र ठसका आणला. येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातही तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचे भांडवल अडकवत मिरचीच्या विविध वाणांची लागवड केली. एक महिन्यापूर्वी १२ ते १६ रुपये किलोने विकणारी मिरची आज मात्र ६ ते ८ रुपये किलोने विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ढोबळी मिरचीची अवस्था तर यापेक्षाही वाईट झाली असूनही मिरची फुकट घ्यायला सुद्धा कोणी तयार नाही.

  जून महिन्याच्या सुरवातीला मिरचीच्या आरमार वाणाची लागवड केली लागवड केल्यावर ठिबक साठी १० हजार रुपये खर्च केला औषधे मजुरी यावरही सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च झाला मात्र मिरचीचे भाव पडल्याने भांडवलही सुटते की नाही असा प्रश्न पडला आहे

  गफ्फार दरवेशी, मिरची उत्पादक

  मिरची तोडण्यासाठी प्रतिकिलो ६ ते ७ रुपये खर्च येतो. वाहतुकीसाठी प्रतिकिलो २ रुपये खर्च येतो. अन‌् मिरची बाजारात घेऊन गेल्यावर भाव मिळतो प्रतिकिलो ८ ते ९ रुपये. मिरची विक्रीनंतर सर्व पैसे मजुरी व वाहतुकीसाठी खर्च होत असल्याने गुंतवणूक केलेले हजारो रुपये भांडवलही हाती येते की नाही असा प्रश्न पडला आहे.

  योगेश पगार , मिरची उत्पादक

  कांद्याचे दर
  दिनांक सरासरी भाव
  २६ एप्रिल १२५०
  ०५ मे १०५०
  ०२ जून १५५०
  १५ जुलै १३५०
  २५ ऑगस्ट १४५०
  ०२ सप्टेंबर १३५०
  टाेमॅटाे
  दिनांक सरासरी भाव
  २१ ऑगस्ट ५०
  २९ ऑगस्ट ३०