राहुल गांधींवरील हल्ल्याचा निषेध, लासलगावी रास्ता रोको आंदोलन

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहूल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर हल्ला करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

लासलगाव : उत्तर प्रदेशमधील (UP) हाथरस (Hathras) येथे खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (priyanka Gandhi) यांच्यावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याच्या (Attack) व धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ लासलगाव (Lasalgaon ) विंचूर चौफुलीवर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्ता रोको करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (Yogi Adityanath)  आणि भाजपविरोधी (BJP)  घोषणाबाजी केली. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होता.

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहूल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला रवाना झाले. मात्र त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर हल्ला करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे, राजाराम पानगव्हाणे, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर, राजाभाऊ शेलार, जिल्हा सरचिटणीस दिगंबर गीते, गुणवंत होळकर, रमेश कहांडळ, भैया देशमुख, प्रकाश अडसरे, साहेबराव ढोमसे, मधुकर शेलार, डॉ. विकास चांदर, सचिन होळकर, मिराण पठण, योगेश डुकरे, सुहास सुरळीकर, सुनील निकाळे, सचिन खरताळे, अस्लम शेख, सतीश पवार, शहजाद पठाण आदी उपस्थित होते.