जनसेवाला मतदारांनी नाकारले ; कातरणीत ग्रामविकास पॅनलची बाजी

कातरणी ग्रामपंचायतीत एकूण अकरा सदस्य निवडून द्यायचे होते त्यापैकी ग्रामविकास पॅनेलच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी मतदान घेण्यात आले मतदान संपल्यानंतर लगेचच तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी ग्रामविकास पॅनलकडे सत्ता सोपवली आहे.

    येवला : ग्रामपंचायत लिलाव प्रकरणी चर्चेत आलेल्या कातरणी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलने लक्ष्मण कदम गोवर्धन कदम पुंडलिक कदम दामू सोनवणे आप्पा सोनवणे रतन जाधव संपत कदम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत सर्वच्या सर्व ११ जागी दणदणीत विजय मिळवला. तर जनसेवा पॅनेलला पराभवाची धूळ चाखावी लागली. कातरणी ग्रामपंचायतीत एकूण अकरा सदस्य निवडून द्यायचे होते त्यापैकी ग्रामविकास पॅनेलच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी मतदान घेण्यात आले मतदान संपल्यानंतर लगेचच तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी ग्रामविकास पॅनलकडे सत्ता सोपवली आहे.

    ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रद्द करत नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १२ मार्च रोजी ही निवडणूक पार पडली मतदानासाठी ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावलेल्या दिसून आल्या. रात्री आठ वाजेच्या सुमारास मतमोजणी होऊन लक्ष्मण कदम गोवर्धन कदम पुंडलिक कदम दामू सोनवणे आप्पा सोनवणे रतन जाधव संपत कदम यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने ११ पैकी ११ जागांवर विजय संपादन केला.

    ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली या दोन्ही जागी ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली यात धोंडीराम कारभारी कदम (२३६), सरीता बाळकृष्ण सोनवणे (२०८), प्रभाग क्रमांक २ मध्ये एकूण तीन जागा होत्या. यापैकी ग्रामविकास पॅनेलचे सुखदेव गणपत आहेर व योगिता अनिल कदम यांची बिनविरोध निवड झाली होती. तर रेखा सोपान कदम ३२० मते घेऊन विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ग्रामविकास पॅनलच्या तिन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या. आहेत. यात अलका आप्पासाहेब सोनवणे, सरला अंबादास सोनवणे, सरला प्रल्हाद शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ४ मध्ये तीन जागांसाठी निवडणूक झाली. मोहन मधुकर कदम (१६३), योगेश शिवाजी पाटील (२००), उज्वला गोकुळ लोहकरे (२४१), या ग्रामविकास पॅनेलच्या तीनही उमेदवारांनी मताधिक्य घेत विजय मिळवला निवडणूक प्रक्रियेदरम्यान किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदान व मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.