नाशिक विभागात ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापसाची खरेदी

विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांची माहिती 

नाशिक : कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनामार्फत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी १ लाख ३ हजार ६३७ शेतकऱ्यांकडून ३१ लाख ४२ हजार  २८४ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ३३ हजार ७०८ शेतकऱ्यांकडून ८ लाख ८४ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याप्रमाणे विभागात एकूण १ लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून एकूण ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  नाशिक विभागात आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात २५ लाख ५५ हजार ६५५ क्विंटल इतकी सर्वाधिक कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात ५ लाख ०९ हजार ७३४ क्विंटल, धुळे जिल्ह्यात ४ लाख ५० हजार २३ क्विंटल, नंदूरबार जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार ४१० क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात ६६ हजार ५९३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही विभागीय सहनिबंध  लाठकर यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.  

 नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी १ हजार २२१ शेतकऱ्यांचा ३९ हजार ६३० क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ७१२ शेतकऱ्यांचा २६ हजार ९६३ क्विंटल अशा एकूण १ हजार ९३३ शेतकऱ्यांचा ६६ हजार ५९४ क्विंटल कापूस पणन महासंघामार्फत खरेदी करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात कोविड कालावधीनंतर कापूस पणन महासंघामार्फत ८५४ शेतकऱ्यांकडून २९ हजार ४८८ क्विंटल तसेच सीसीआय यांचेमार्फत कोविड कालावधीपूर्वी ८ हजार ४४५ शेतकऱ्यांकडून २ लाख ६८ हजार ८८६ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ४ हजार ८५७ शेतकऱ्यांकडून १ लाख ५१ हजार ६४८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात कापूस पणन महासंघ व सीसीआय यांचेमार्फत एकूण १४ हजार १५६ शेतकऱ्यांकडून ४ लाख ५० हजार २३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यात कापूस पणन महासंघामार्फत कोविंड कालावधीपूर्वी २० हजार १५ शेतकऱ्यांकडून ६ लाख ९३ हजार १३० क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ७ हजार ६७२ शेतकऱ्यांकडून २ लाख ७३ हजार २७१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे, याचप्रमाणे सीसीआयमार्फत कोविड कालावधीपूर्वी १५ हजार १७० शेतकऱ्यांकडून ६ लाख ४९ हजार ६७७ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ९ हजार ९२० शेतकऱ्यांकडून १ लाख ३६ हजार २३१ क्विंटल तर खाजगी बाजारात १७ हजार ८८५ शेतकऱ्यांकडून सहा लाख ९१ हजार ४१२ क्विंटल तसेच कोविड कालावधीनंतर ७०१ शेतकऱ्यांकडून २१ हजार ४५० क्विंटल जळगाव बाजार समितीमधील अनुज्ञप्ती धारक व्यापारी यांचेमार्फत कोविड कालावधीपूर्वी ३ हजार १३६ शेतकऱ्यांकडून ९० हजार ४८२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याप्रकारे जळगाव जिल्ह्यात एकूण ७४ हजार ४९९ शेतकऱ्यांकडून २५ लाख ५५ हजार ६५५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

  अहमदनगर जिल्ह्यात कापूस पणन महासंघामार्फत कोविड कालावधीपूर्वी ७ हजार ५५१ शेतकऱ्यांकडून १ लाख ६० हजार ५५८ क्विंटल कोविड कालावधीनंतर ३ हजार  शेतकऱ्यांकडून ८७ हजार ४२९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. याप्रमाणे सीसीआयच्या माध्यमातून कोविड कालावधीपूर्वी १३ हजार १७३ शेतकऱ्यांकडून १ लाख ३१ हजार ३२१ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ९०८ शेतकऱ्यांकडून १५ हजार ७४५ क्विंटल आणि अहमदनगर बाजार समित्यांमधील अनुज्ञप्ती धारक व्यापारी यांच्यामार्फत ४ हजार ९७८ शेतकऱ्यांकडून ९८ हजार ६४५ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर  ५४६ शेतकऱ्यांकडून १६ हजार ३५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३० हजार १५४ शेतकऱ्यांचा ५ लाख ९ हजार ७३४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. 

  नंदुरबार जिल्ह्यात सीसीआयमार्फत कोविड कालावधीपूर्वी १० हजार ५७५ शेतकऱ्यांकडून २ लाख ७३ हजार ६४८ तर कोविडनंतरच्या कालावधीत ४ हजार ५३८ शेतकऱ्यांकडून १ लाख २५ हजार ८७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तसेच नंदुरबारमधील बाजार समिती अनुज्ञप्ती धारक व्यापारी यांचेमार्फत १ हजार ४९० शेतकऱ्यांकडून १४ हजार ८९१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात सीसीआय व बाजार समितीमधील अनुज्ञप्ती धारक व्यापारी या दोघांच्या माध्यमातून १६ हजार ६०३ शेतकऱ्यांकडून ४ लाख ४४ हजार ४१० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. 

  कापूस पणन महासंघ, सी.सी.आय, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक तसेच बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापारी यांचेमार्फत कापूस खरेदी करण्यात येत असते. यानुसार नाशिक विभागात कापूस पणन महासंघामार्फत आजपर्यंत विभागात ४१ हजार २५ शेतकऱ्यांकडून १३ लाख १० हजार ४७१ क्विंटल, सीसीआयकडून ६७ हजार ५८४ शेतकऱ्यांचा १७ लाख ५३ हजार २८ क्विंटल, खाजगी बाजाराच्या माध्यमातून १८ हजार ५८६ शेतकऱ्यांकडून ७ लाख १२ हजार ८६२ क्विंटल तर बाजार समितीमधील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यांमार्फत १० हजार १५० शेतकऱ्यांकडून २ लाख ५० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.