राहुल गांधींच्या अटकेचा येवल्यात निषेध ; भाजप सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

राहुल गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीचा व मारहाणीचा येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला शहरातील विंचूर चौफुली येथे उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोदी व योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

येवला : उत्तर प्रदेशातील (UP)  हाथरस (Hathras) येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Rape Case) पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या खासदार राहुल गांधी  (Rahul Gandhi)  आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (priyanka Gandhi) यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी हुकूमशाही पद्धतीने रोखले. त्यानंतर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर काही वेळात उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक (Arrest) केल्याची माहिती समोर आली.

राहुल गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीचा व मारहाणीचा येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला शहरातील विंचूर चौफुली येथे उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोदी व योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, नंदकुमार शिंदे, नानासाहेब शिंदे, संदीप मोरे, जयप्रकाश वाघ, कैलास घोडेराव, अण्णासाहेब पवार, मुकेश पाटोदकर, विलास पाटील आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.