पावसाची दडी , धरणांत साठा कमी ; नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट

पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर मुसळधार पाऊस झाला नाही. धरणक्षेत्रातदेखील पावसाची परिसि्थती खूप काही चांगली नाही. त्यामुळे शेतकरीदेखील मेटाकुटीला आहे. आता महापािलकेच्या आरक्षित पाणीसाठ्यापैकी केवळ ५७९.५८ दशलक्ष पाणीच शिल्लक राहिल्याने पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला नाही तर हे संकट अजून गडद हाेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

  नाशिक : गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने नाशिककरांसमाेर पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. शहर परिसरात असलेल्या तीन धरणांमध्ये महापािलका क्षेत्रासाठी ५५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण आहे. त्यापैकी केवळ ५७९.२८ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण आता शिल्लक राहिले आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी आता मनपाच्या हाती आहे. पाण्याचे याेग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात महापालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.

  पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर मुसळधार पाऊस झाला नाही. धरणक्षेत्रातदेखील पावसाची परिसि्थती खूप काही चांगली नाही. त्यामुळे शेतकरीदेखील मेटाकुटीला आहे. आता महापािलकेच्या आरक्षित पाणीसाठ्यापैकी केवळ ५७९.५८ दशलक्ष पाणीच शिल्लक राहिल्याने पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला नाही तर हे संकट अजून गडद हाेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

  येत्या चार-पाच महिन्यांत महापािलकेच्या निवडणुका हाेणार आहेत. त्यामुळे शहर परिसरात पाणीकपात हाेेऊ नये, अशी सत्ताधारी भाजपाची भूमिका आहे. मात्र पाणीच शिल्लक राहिले नाही तर द्यायचे कुठून? हाही प्रश्न आहे. आता पाणीकपात केली तर नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागण्याची भीती सत्ताधाऱ्यांना सतावते आहे. त्याचा परिणाम महापालिका निवडणुकांवर हाेऊन फटका बसण्याची शक्यता सत्ताधारी गाेटातून वर्तविली जात असल्याने पाणीकपातीवरून पुन्हा एकदा प्रशासन आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

  तुम्हीच पाऊस आणा!
  पाणीसाठा कमी असल्याने शहर परिसरात पाणीकपात करण्याचे संकेत प्रशासनाने दिल्यानंतर भाजपाने त्याला विराेध केला. पाऊस पडला नाही तर पाणीकपात करावीच लागेल, असे म्हणत पालकमंत्री भुजबळ यांनी त्यांना पाणीकपात नकाे असेल तर त्यांनी पाऊस आणावा, असे म्हणत भाजापला टाेला लगावला. त्यामुळे पाणीकपातीवरून येत्या काळात महापािलकेत राजकारण पेटण्याची शक्यता आहे. महापािलका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. त्यामुळे पाणीकपात झाली तर राष्ट्रवादीला त्याचे भांडवल निवडणुकीत करता येईल, असा सूर भाजपाच्या गाेटातून वर्तवला जात आहे. त्यामुळेच भाजपा पाणीकपातीला विराेध करत आहे.

  प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच पाणीकपातीचा प्रस्ताव सादर केला हाेता. मात्र महापाैरांसह सर्वपक्षीय गटनेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हाेता. त्यानंतर महापाैर आणि गटनेत्यांनी गंगापूर धरणाची पाहणी करून सध्या तरी अशाप्रकारची पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे सांगितले हाेते. अतिरिक्त पाणी वापरण्याबाबत जलसंपदा विभागाकडून परवानगीदेखील मागऱ्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस पडला नाही आणि जलसंपदा विभागानेही अतिरिक्त पाणी वापरण्यास परवानगी दिली नाही तर नाशिककरांना पाणीटंचाईचा सामना करणे अटळ ठरणार आहे, हे मात्र नक्की.