पाऊस, नियमांचा फटका! गडावरील व्यावसायिक यांच्या आशा आता नवव्या माळेवर

सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक यांनी आडाखे बांधत दुकानामधे विविध स्वरुपाच्या वस्तू विक्रीसाठी नियोजन आखले. मात्र दर्शनासाठी किचकट प्रक्रिया व पाऊस यामुळे भाविकांना अकारण होऊ लागलेला त्रास याचा िवपरित परिणाम भािवक वर्गाच्या उपस्थितीवर झाला. यामुळे स्वाभाविकतः मंदिचे सावट व्यवसायावर आले.

    वणी : सप्तशृंग गडावर राविवारी झालेल्या पावसाचा परिणाम सोमवारी दिसून आला. गडावर भाविकांच्या संख्येतील घट आज जाणवल्याने व्यावसायिक यांचे डोळे आता नवव्या माळेकडे लागले आहेत.

    ग्राहकांची प्रतीक्षा
    सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक यांनी आडाखे बांधत दुकानामधे विविध स्वरुपाच्या वस्तू विक्रीसाठी नियोजन आखले. मात्र दर्शनासाठी किचकट प्रक्रिया व पाऊस यामुळे भाविकांना अकारण होऊ लागलेला त्रास याचा िवपरित परिणाम भािवक वर्गाच्या उपस्थितीवर झाला. यामुळे स्वाभाविकतः मंदिचे सावट व्यवसायावर आले. गेल्या पाच दिवसांत व्यवसायात आर्थिक गतिमानता आली नाही. त्यामुळे आता नवव्या माळेकडे व्यावसायिक यांचे डोळे लागले आहेत. कारण नवरात्र कालखंडात सातव्या व नवव्या माळेला पारंपरिक महत्व असल्याची भावना भाविकांची असते व या दिवशी दर्शन घेतल्याने आत्मिक आनंदाची अनुभुती होते, अशी मान्यता असल्याचा व्यावसायिकांचा विश्वास आहे. त्यामुळेच नवव्या माळेला भाविकांच्या खरेदीच्या माध्यमातून चांगली उलाढाल होईल, असे गणित आखले गेले आहे.

    याची हाेईल खरेदी
    पूजासािहत्य, पैठणी, साड्या, प्रसाद, कुंकु, सौभाग्यलंकार, हाॅटेल्स, लाॅजिंग, खेळणी, शोभेच्या वस्तू, खाद्यान्न, पदार्थ फुल व फुलांच्या माळा, विविध रंगाचे धागे, देवीचे फोटो, व इतर सर्व प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक यांच्या नजरा सातव्या व नवव्या माळेकडे लागल्या आहे.