Rains in Nashik! Damage to 265 hectares of agriculture in Malegaon taluka; A big blow to the farmers

मंगळवारी पहाटे तालुक्यातील मालेगावासह १२ ही मंडळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यात निमगाव मंडळातील जेऊर, साकुरी, जाटपाडे, निंबायती येथे जोरदार जोरदार पाऊस झाला. यात एकट्या निमगाव मंडळात ६८.०० तर जळगाव निं. मंडळात ६६.०० मी.मी एवढा पाऊस झाल्याने ओढे नाले मर्यादा सोडून वाहत होते. तर शेतांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र दिसून आले.

  नाशिक : मालेगाव शहरासह तालुक्यातील दाभाडी, अजंग, वडनेर, करंजगव्हण, झोडगे, कळवाडी, कौळाने, जळगांव नि., सौंदाने, सायने, निमगाव या मंडळातील परिसरात अतिवृष्टी झाली. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील खरीपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही गावात घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

  शेताला शेतळ्याचे स्वरूप

  तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठा खंड पडला होता. गत आठवड्यात रिमझिम पाऊस झाल्यानंतर काल मंगळवारी पहाटे तालुक्यातील मालेगावासह १२ ही मंडळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यात निमगाव मंडळातील जेऊर, साकुरी, जाटपाडे, निंबायती येथे जोरदार जोरदार पाऊस झाला. यात एकट्या निमगाव मंडळात ६८.०० तर जळगाव निं. मंडळात ६६.०० मी.मी एवढा पाऊस झाल्याने ओढे नाले मर्यादा सोडून वाहत होते. तर शेतांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र दिसून आले.

  पंचनाम्यांचे आश्वासन

  तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी साकुरी, निंबायती, जाटपाडे या गावांना प्रत्यक्ष भेट देवून नुकसानीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तहसीलदार राजपूत यांनी लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आश्वासन दिले असून, पालकमंत्री भुजबळ यांनी देखील याबाबत सूचना केल्याचे सांगितले.

  १३ घरांचे नुकसान

  काल झालेल्या या पावसाने कांद्यासह इतर पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. यात एकूण ३८४ बाधित खातेदारांचे २६५ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तर १३ घरांचे व एका जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार राजपूत यांनी दिली.