आरोग्यमंत्र्यांनी मालेगावला दिली भेट, कोरोनाच्या परिस्थितीचा घेतला आढावा

नाशिक: राज्यात कोरोना रुग्ण जास्त आढळून येत असलेल्या मालेगाव शहराला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी भेट दिली. उपचार करणारी यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत त्यांनी चर्चा करून

नाशिक: राज्यात कोरोना रुग्ण जास्त आढळून येत असलेल्या मालेगाव शहराला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी भेट दिली. उपचार करणारी यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत त्यांनी चर्चा करून कोरोनामुक्तीसाठी ‘मिशन मालेगाव’ यशस्वी करण्याचा निर्धार केला. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आधी उपस्थित होते.नाशिक येथील आढावा  बैठक आटोपून ते मालेगाव भेटीसाठी रवाना झाले. या भेटीत त्यांनी मालेगाव येथील जीवन हॉस्पिटल येथे भेट दिली जेथे कोरोनाच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर आरोग्यमंत्री मालेगावच्या सामान्य रुग्णालयाच्या भेटीसाठी गेले तेथेही त्यांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती घेतली.