रणरागिनी : जैवविविधतेचे संवर्धन करून कुटुंबाची जबाबदारी पेलणारी ‘जिजा’

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य दिंडोरी तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या रणतळे जवळ असलेल्या वनारवाडी गावातील जिजा घरकाम सांभाळून उत्कृष्टरित्या शेती करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. दत्तात्रय भेरे गावचे उपसरपंच असल्याने तसेच व्यावसायिक व्याप मोठा असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय ते वेळेअभावी सांभाळू शकत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी जिजा यांनी कमरेला पदर खोचून शेतीची सर्व कामे चोखपणे पार पाडण्याचा िवडा उचलला.

    प्रवीण दाेशी, वणी : चूल आणि मूल या संकल्पनेतून एकविसाव्या शतकातील रणरागिणी बाहेर आली आहे. आज काेणतेही क्षेत्र असाे पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहूना त्यापेक्षाही पुढे जाऊन कुटुंबाच्या आणि देशाच्या प्रगतीत महिला हातभार लावू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी आधुनिकतेची कास धरली तरी आपली परंपरा आणि संस्कृती मात्र जाेपासली जात आहे, हे विशेष. अशीच एक रणरागिणी आहे रणतळेजवळ असलेल्या वानरवाडी गावात. येथील उपसरपंच दत्तात्रय भेरे यांच्या साैभाग्यवती जीजा. आपल्या शेतात जैवविविधता जाेेपासत आधुनिक शेतीची कास या रणागिणीने धरली आहे.

    कृषी क्षेत्रातील अग्रगण्य दिंडोरी तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या रणतळे जवळ असलेल्या वनारवाडी गावातील जिजा घरकाम सांभाळून उत्कृष्टरित्या शेती करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. दत्तात्रय भेरे गावचे उपसरपंच असल्याने तसेच व्यावसायिक व्याप मोठा असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय ते वेळेअभावी सांभाळू शकत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी जिजा यांनी कमरेला पदर खोचून शेतीची सर्व कामे चोखपणे पार पाडण्याचा िवडा उचलला. अवघे ९ वी शिक्षण झालेल्या जिजा या स्वतः त्यांच्या शेतात गावरान आणि जैवविविधता असलेल्या पिकांच्या जातींचे संवर्धन करून दर्जेदार टोमॅटो, भोपळा, कांदा व इतर भाजीपाल्याची पिके घेऊन दरवर्षी लाखो रूपये कमवतात.

    ‘शेतीत मी कधीच पाय ठेवत नाही’ असे सांगतानाच घरचा सर्व खर्च तसेच मुलांचा शैक्षणिक खर्च जिजा यांच्या उत्पन्नातूनच भागवला जातो; हे मात्र दत्तात्रयभाऊ अभिमानाने सांगतात. शेतीचे काम सांभाळून जिजा घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांचा यथोचित पाहुणचारदेखील करतात. त्याचबरोबर घरातील वयोवृद्ध सासू-सासऱ्यांची काळजी देखील तितक्याच मायेने त्या घेतात. या दाम्पत्याला चिरंजीव विजय व कन्या जागृती ही दोन रत्ने आहेत. दोघेही मुलं उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांच्या अभ्यासाकडे जिजा या आपली सर्व कामे सांभाळून लक्ष देतात. आणि म्हणूनच इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विजय आणि जागृती यांनी आजपर्यंत अभ्यासातला प्रथम, द्वितीय क्रमांक कधी सोडलाच नाही. जिजा यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगून गावातील इतर महिला देखील सक्षम होण्यासाठी सौ. जिजा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगतीच्या वाटा शोधत आहेत. चूल आणि मूल या पारंपरिक कामाबरोबरच जिजा यांच्या कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांच्या कर्तृत्वाला आमच्या सर्वांचा मानाचा मुजरा.