बिल्डरला धमकावल्याप्रकरणी रवी पुजारीला काेठडी

पाथर्डी फाटा येथील बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटीची खंडणी पुजारी यांनी मागीतली होती. त्यात गोळीबारही करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी नाशिक येथे सुरु आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने तपास पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी पुजारी यांच्या फोन कॉलचा आवाज तपासण्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तज्ञाकडे पाठवल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात सराकारतर्फे  जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला.

    नाशिक : बांधकाम व्यावसायिकाला धमकी देत गोळीबार केल्या प्रकरणी गँगस्टर रवी पुजारी याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. गुरुवारी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात रवी पुजारी याला सशस्त्र पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात होते. याच प्रकरणात अगोदर ६ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

    पाथर्डी फाटा येथील बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटीची खंडणी पुजारी यांनी मागीतली होती. त्यात गोळीबारही करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी नाशिक येथे सुरु आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने तपास पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी पुजारी यांच्या फोन कॉलचा आवाज तपासण्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तज्ञाकडे पाठवल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात सराकारतर्फे  जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर पुजारी यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचे आदेश देण्यात आले.

    दुचाकी लांबवली
    शहरात वाहन चोरीचे प्रकार सुरूच असून गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून इमारतीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.२७) रात्री घडली. याप्रकरणी समिर मायकल मकासरे (रा. एश्वर्या पार्क, दत्तचौक, गंगापुर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली एमएच १५ ईक्यु ३३८३ ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी २७ एप्रिलच्या रात्री चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.