येवल्यात शासकीय बाजरी खरेदी केंद्राला मान्यता

येवला : तालुक्यात यावर्षी खरिप हंगामात तालूक्यात ८ हजार हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झालेली असून, सध्या ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभावाने बाजरी विक्री होत आहे. कवडीमाेल भावात बाजरीची विक्री करावी लागत असून, यातून पिकाचा उत्पादन खर्चही निघणार नाही.

येवला : तालुक्यात यावर्षी खरिप हंगामात तालूक्यात ८ हजार हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झालेली असून, सध्या ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभावाने बाजरी विक्री होत आहे. कवडीमाेल भावात बाजरीची विक्री करावी लागत असून, यातून पिकाचा उत्पादन खर्चही निघणार नाही. शासकीय भरड धान्य खरेदी योजनेअंर्तगत अाधारभूत किंमत २१५० रुपये दराने शासनाने शासकीय बाजरी खरेदी केंद्र येवल्यात सुरू करुन बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली होती.

पालकमंत्री भुजबळ यांनी शासनाच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्हयात किमान आधारभूत किमतीनुसार बाजरी खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान अाधारभूत किंमत योजने अंर्तगत जिल्हाधिकारी नाशिक यांच्या मंजुरीने शासकिय बाजरी खरेदी केंदासाठी येवला तालुका सह. खरेदी विक्री संघाची नेमणूक केली आहे.

१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत २१५० रुपये प्रति क्विंटल दराने एफएव्यु प्रतिची शासकिय बाजरी खरेदी होणार असल्याची माहिती चेअरमन अनिल सोनवणे, व्हा.चेअरमन दगडू पा. टर्ले यांनी दिली आहे.

तालूका कृषी विभागाच्या अहवालानुसार एकरी सरासरी १३ क्विंटल बाजरी उत्पादन होऊ शकते ८ हजार हेक्टर पैकी साडेपाच हजार हेक्टरचीच अपेक्षित बाजरी उत्पादन विक्रीसाठी बाजारात आल्यास १७८७५० क्विंटल इतकी आवक राहिल. बाजरीची शासकीय आधारभूत किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रति क्विंटल ११०० रु. नुकसान आज शेतकऱ्यांना सोसावे लागत अाहे. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या मागणीमुळे व पालकमंत्री भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे शासकीय बाजरी खरेदी केंद्र येवला तालूक्यात सुरू होणार असल्याने बाजरी धान्य उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध १७८७५० क्विंटल बाजरी धान्याच्या माध्यमातून २० कोटी रुपयाचा फायदा तालूक्यातील बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

येवल्यात शासकीय बाजरी केंद्रास मान्यता हा शेतकरी हिताचा निर्णय आहे. बाजरी हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व मका ७५ ते ८० क्विंटल मर्यादेप्रमाणे खरेदी व्हावी ही अपेक्षा.

- अॅड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते

“शासकीय बाजरी ऑनलाईन नोंदणी नोव्हें. २०२० ला सुरू होणार आहे. बाजरी पिकाची ७/१२ उता-यावर ऑनलाईन नोंद, ८ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स बॅक पासबूक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करुन ठेवावी.”
– बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ येवला