सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानासाठी सायंकाळी सातची वेळ ठरवून दिली आहे. मात्र तरीही नाशिककरांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. परिणामी जिल्हाधिकारी मांढरे यांनी निर्बंध अधिक कडक करतानाप्रसंगी संपूर्ण लॉकडाऊन इशारा दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय आता सर्वस्वी सर्वसामान्य नागरिकांच्या हाती आहे.

    नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन नागरिकांना वारंवार सूचना देऊन नियमांचे पालन करण्यास सांगत आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून नियमांचे पालन हाेत नसल्याने काेराेनाचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात २५०० रूग्ण वाढले आहेत. इतकी गंभीर परिस्थती असतानाही नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाराजी व्यक्त करताना जिल्हावासीयांना रविवारपर्यंतची डेडलाईन दिली. यावेळेत परिस्थिती न सुधारल्यास संपूर्ण लॉकडाऊन निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
    जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताे आहे. काेराेनाबाधितांची रूग्ण संख्या ५००० च्यापुढे गेली आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानासाठी सायंकाळी सातची वेळ ठरवून दिली आहे. मात्र तरीही नाशिककरांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. परिणामी जिल्हाधिकारी मांढरे यांनी निर्बंध अधिक कडक करतानाप्रसंगी संपूर्ण लॉकडाऊन इशारा दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय आता सर्वस्वी सर्वसामान्य नागरिकांच्या हाती आहे.