नाेकरभरती, अनियमित खरेदी भाेवली ; जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त

जिल्हा बँकेतील नोकरभरती व अनियमित खरेदी प्रकरणी दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. पण, या प्रकरणात संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने बरखास्तीला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवल्यामुळे या प्रकरणात असलेल्या संचालकांना पुढील दहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविता येणार नाही.

    नाशिक : गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ बरखाखास्तीच्या आदेशाला दिलेली स्थगिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली. अध्यक्ष केदा आहेर यांनी केलेली स्थगितीची याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या निर्णयामुळे बँकेत खळबळ निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले असून विद्यमान संचालकांना निवडणूक लढवण्याचा मार्गही बंद झाला आहे. पण, या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे. या निर्णयामुळे आता बॅंकेवर प्रशासक नियुक्ती हाेणार आहे.

    नाेकरभरतीचा वाद
    जिल्हा बँकेतील नोकरभरती व अनियमित खरेदी प्रकरणी दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. पण, या प्रकरणात संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने बरखास्तीला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवल्यामुळे या प्रकरणात असलेल्या संचालकांना पुढील दहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविता येणार नाही.

    अद्वय हिरेंचा पाठपुरावा
    या प्रलंबित खटल्यासाठी काही महिन्यांपूर्वी बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी या याचिकेचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर दोन महिन्यांपासून त्यांची सुनावणी सुरु होती. आज त्याचा अंतिम आदेश न्यायमूर्ती बिस्ट आणि धानुका या खंडपीठाने निकाल दिला. त्यात अध्यक्ष केदा आहेर यांची याचिका फेटाळण्यात आली. येत्या आठ दिवसांत अध्यक्षांनी आपला कार्यभार प्रशासकांना द्यावा असे आदेशात म्हटले. अद्वय हिरे यांच्या वतीने अॅड विश्वजीत मोहिते यांनी काम पाहिले.

    या नेत्यांची हाेणार अडचण
    दरम्यान, या निकालामुळे जिल्ह्यातील शिरीष कोतवाल, आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दिलीप बनकर, सीमा हिरे, सुहास कांदे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार अनिल कदम, गणपतराव पाटील, शिवाजी चुंभळे, परवेझ कोकणी, संदीप गुळवे, नामदेव हलकंदर, माजी आमदार जे. पी. गावित यांसह सर्वच राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना पुढील दहा वर्षे निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आता आपल्या जागी पर्यायी उमेदवार तयार करण्याची वेळ आली आहे.