मोबाईलवर शूटिंग करण्यास नकार; कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने रुग्णालयातील कर्मचाऱ्याला चोपून काढले

कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने रुग्णालयातील कर्मचाऱ्याला चोपून काढले आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकर घडला आहे. अशोककुमार भाटिया असे मारहाण करमाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी आले होते. यासाठी त्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन देखील केले होते. मात्र, आजचे टार्गेट पूर्ण झाले आहे उद्या या असे रुग्णायल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

    नाशिक : कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने रुग्णालयातील कर्मचाऱ्याला चोपून काढले आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकर घडला आहे.

    अशोककुमार भाटिया असे मारहाण करमाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी आले होते. यासाठी त्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन देखील केले होते. मात्र, आजचे टार्गेट पूर्ण झाले आहे उद्या या असे रुग्णायल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

    पण, आजच लस द्या अशी मागणी करत त्यांनी लसीकरण केंद्रात गोंधळ घालत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली.याचे त्यांनी मोबाईलवर शुटींग करण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर शूटिंग करू देण्यास नकार देताच याचा राग आल्याने भाटिया यांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली.

    अशोककुमार भाटिया यांच्याविरोधात सरकरवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.