…साहेब आले अन‌् नारळ फाेडून गेले! ; निवडणूकपूर्व विकासकामांचा महापूर

गेल्या चार वर्षांत स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिकेने अनेक ‘चांगले’ रस्ते खाेदून तेथे नवीन ‘स्मार्ट’ रस्ते बनवलेले नागरिकांनी पाहिले आहे. अशाेक स्तंभापासून सुरू झालेला स्मार्ट रस्ता तर कुठे संपताे, हेही वाहनचालकांना कळत नाही! इतका ‘स्मार्ट’ हा रस्ता झाला आहे.

    नीलेश अलई , नाशिक : राज्यात कुठल्याही निवडणुका हाेण्याची वेळ आली की विकासकामांचा महापूर यायला सुरूवात हाेते. न भूताे न भविष्यती अशी विकासकामे सुरू हाेेतात. या विकासकामांचे पुढे काय हाेते; हे सर्वांनाच माहीत आहे. यातील किती पूर्ण हाेतात आणि किती नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सध्या नाशिकलाही महापािलका निवडणुका जवळ आल्या असल्याने विकासकामांचा महापूर आला आहे. गेल्या चार वर्षांत झाली नाहीत इतक्या विकासकामांचे नारळ सध्या फाेडले जात आहे. दुसरे काहीही असाे पण निवडणुकांमुळे का असेना जनतेला विकासाच्या आशेचा किरण दिसताे, हेही नसे थाेडके!

    महापालिका निवडणुकीला जवळपास एक वर्ष राहिले आहे. हे एक वर्ष नाशिककरांसाठी विकासकामांच्या उद‌्घाटनांची पर्वणीच ठरणार आहे. गेल्या एक वर्षांपासून तर ‘काेराेना’ने महापालिकेला विकास करण्यापासून राेखले हाेते. त्याआधीचे न बाेललेलेच बरे! आता काेराेनाचा प्रादूर्भाव वाढत असला तरी अनलाॅक झाले आहे; त्यामुळे महापािलकेला शहर विकासापासून आता काेणी राेखू शकणार नाही, असे चित्र दिसते आहे. येत्या वर्षभरात शहराचे रूपडे पालटेल इतक्या विकासाकमांचे नारळ गेल्या दीड-दाेन महिन्यांत फुटले आहे. हा प्रवास अजून पुढे सुरूच राहील. त्यामुळे नाशिककरांनी आता बदलत्या नाशिकचा आस्वाद घेण्यासाठी तयारी करायला हवी, असेच वातावरण सध्या तरी नाशिकमध्ये आहे.

    गेल्या चार वर्षांत स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिकेने अनेक ‘चांगले’ रस्ते खाेदून तेथे नवीन ‘स्मार्ट’ रस्ते बनवलेले नागरिकांनी पाहिले आहे. अशाेक स्तंभापासून सुरू झालेला स्मार्ट रस्ता तर कुठे संपताे, हेही वाहनचालकांना कळत नाही! इतका ‘स्मार्ट’ हा रस्ता झाला आहे.

    सत्तासंघर्षात अडकला ‘विकास’
    गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणाने महापािलकेत सत्तासंघर्ष सुरू आहे. गेल्या दीड-दाेन महिन्यांपासून स्थायी समितीसाठी सत्ताधाऱ्यांना संघर्ष करावा लागताे आहे. न्यायालयाच्या आदेशाने शिवसेनेचा एक सदस्य स्थायी समितीत वाढल्याने सभापतीपदासाठी माेठी कसरत सत्ताधाऱ्यांना करावी लागते आहे. त्यामुळे यातून वेळ काढून इतका विकास हाेताे आहे, हे काही कमी नाही.

    विकासकामे पूर्णत्वास जावीत; हीच अपेक्षा
    गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विकासकामांचा धडाका आशादायक असला तरी ही विकासकामे पूर्णत्वास जावीत, हीच नाशिककरांची अपेक्षा आहे. नाहीतर निवडणुकांपुरता विकासकामांचे भूिमपूजन करायचे आणि नंतर याकडे ढुंकूनही बघायचे नाही, असे हाेऊ नये, याची काळजीही विकासकामांचे भूमिपूजन करणाऱ्यांनी घ्यायला हवी.

    तिजोरीत खडखडाट!
    काेराेनामुळे उत्पन्नात घटत झाल्याचे आयुक्तांनी वारंवार सांगितले आहे. महापालिकेच्या तिजाेरीत भर पडावी म्हणून अभय याेजनेसारख्या उपायांचा प्रशासन वापर करत आहे. महापािलकेच्या तिजाेेरीत पैसे आले तरच विकासकामे शक्य हाेणार आहेत. त्यामुळे उद‌्घाटन झालेली किती विकासकामे मार्गी लागतील, याबाबत नाशिककर साशंक आहेत. ….साहेब आले अन‌् नारळ फाेडून गेले असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर येऊ नये, हीच माफक अपेक्षा!

    गाेदाघाटाच्या विकासाची ‘गाेष्ट’
    स्मार्ट सिटी बनण्यासाठी सज्ज असलेल्या नाशिकचे वैभव असलेल्या गाेदाघाटाची अवस्थाही नािशककर अनुभवत आहेत. मग त्यात रामकुंडाचे खाेदकाम असाे; पूररेषेचा प्रश्न असाे; अथवा सध्या गाजत असलेला गाळ काढण्याच्या नावाखाली ‘वाळू विक्री’चा विषय असाे. सर्व कसे आलबेल चालले आहे. पण हाे! या सर्वांच्या निमित्ताने का असेना शहरात काहीतरी विकास हाेत आहे, याची चर्चा मात्र सुरू आहे.

    गाेदाप्रेमींचा संघर्ष
    गाेदाघाट तसेच गाेदावरीच्या स्वच्छतेपासून तर येथे बांधण्यात येत असलेल्या िभंतीपर्यंत सर्वच ठिकाणी गाेदाप्रेमींना संघर्ष करावा लागताे आहे. विकासाच्या नावाखाली गाेदावरीची ‘वाट’ लावण्याचा हा कार्यक्रम थांबवण्यासाठी गेल्या काही िदवसांपासून गाेदाप्रेमीही संघर्ष करत आहेत.