सराईत गुन्हेगार संजय धामणेची इगतपुरीत निर्घृण हत्या

इगतपुरी : देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे (४२) याची जुनी कुरापत काढण्यासाठी एका टोळक्याने तिक्ष्ण हत्याराने पोटावर, छातीवर, तोंडावर केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी (दि. १८) रात्री १०.४५ वाजता हत्या झाली. इगतपुरी येथील डाक बंगला अॅम्बेसिडर हॉटेलसमोर घरी जात असताना त्याच्यावर हल्ला झाला.

इगतपुरी : देवळाली गावातील सराईत गुन्हेगार संजय बबन धामणे (४२) याची जुनी कुरापत काढण्यासाठी एका टोळक्याने तिक्ष्ण हत्याराने पोटावर, छातीवर, तोंडावर केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी (दि. १८) रात्री १०.४५ वाजता हत्या झाली. इगतपुरी येथील डाक बंगला अॅम्बेसिडर हॉटेलसमोर घरी जात असताना त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संशयितांचा शाेध सुरू
देवळाली गावातील संजय धामणे हा शुक्रवारी इगतपुरीतील डाक बंगला येथे राहणाऱ्या दुसऱ्या पत्नीकडे जात असताना टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच ठार झाला. इगतपुरी पोलिस ठाण्यात दीपक दत्तात्रय पाटील (३२) रा. नाशिकरोड यांच्या तक्रारीवरुन संशयित अजय पॅट्रिक मॅनवेल, सायमन उर्फ पापा पॅट्रिक मॅनवेल, अजय उर्फ टकल्या पवार, आशा पॅट्रिक मॅनवेल सर्व रा. इगतपुरी, राजकुमार भारती रा. कल्याण यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून, यातील आशा पॅट्रिक मॅनवेल हिला ताब्यात घेतले आहे. बाकी संशयितांचा कसून शोध सुरु आहे.

कट रचून हत्या
सहा वर्षांपूर्वी इगतपुरीतील कुख्यात गुन्हेगार डेविड मॅनवेल याचा कल्याण भागात खून झाल्याच्या कारणावरुन संशयित म्हणून राजू धामणे हा तळोजा जेलमध्ये आहे. या खूनाचा बदला म्हणून संजय धामणेचा खून झाल्याची परिसरात चर्चा आहे. संजय धामणेवर शहरातील विविध पाेलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मयत याचा भाऊ राजेश बबन धामणे हा डेव्हीड पॅद्रिक मॅनवेल याचे खुनाचे केसमध्ये तळोजा जेलमध्ये असून, त्याचे न्यायालयातील तारखेचे वेळी भेटण्याकरिता फिर्यादी व त्याचे नातेवाईक जात होते. तेव्हा यातील आरोपीत हे देखील तारखेसाठी न्यायालयात येत होते. तेव्हा यातील आरोपी आशा मॅनवेल हिने वरील आरोपीना चिथावणी देऊन फिर्यादीचा मामा व मयत तसेच त्याचे साथीदार यांचा जिव घेतल्या शिवाय शांत राहणार नाही. असा कट कारस्थान करुन शुक्रवारी रात्री क्रूर हत्या केली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक एस. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. डी. डी. पाटील, विनोद गोसावी, सचिन देसले व पथक करत आहे.