sanjay raut

मुख्यमंत्री कार्यालयाच्या(cmo office) अधिकृत ट्विटर हँडलवरुन अनेकदा औरंगाबाद(aurangabad) शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. यावर  “सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या(aurangabad name change मुद्द्यावरुन सध्या वाद सुरु आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अनेकदा औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. यावर  “सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालतं”.

नाशिकमधील भाजपाचे बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत.