‘वाघाशी मैत्री होत नाही, कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर

संजय राऊत(Sanjay Raut) हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर(Sanjay Raut Maharashtra Visit) आहेत. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेत आहेत. 

    नाशिक: वाघाशीही दोस्ती(Friendship With tiger) करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील(Chandrakat Patil) यांना शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

    संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेत आहेत.

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान केले होते. त्यावर वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो. दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.

    पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.