‘ब्रेक द चेन’अंतर्गत येवल्यात तीन दुकाने सिल ; येवला नगरपालिका ॲक्शनमोडमध्ये

नागड दरवाजा सर्कल जवळ उभ्या असलेल्या गाड्यावरील सामान देखिल जप्त करण्यात आले आहे. विना मास्क फिरणाऱ्या चार जणांना नवीन नियमावलीनुसार प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला असून एकूण चार ठिकाणी कारवाई व दोन हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी दिली आहे.

    येवला: ब्रेक द चेनअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी येवला नगरपालिका क्षेत्रात तीन दुकाने सिल करण्यात आली असल्याची माहीती मुख्याधिकारी सुनिता नांदुरकर यांनी दिली आहे. एकुणच येवला नगरपरिषद प्रशासन ॲक्शनमोडमध्ये आले आहे.वाढती कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात रहावी, यासाठी येवला नगरपालिका प्रशासनाने मुख्याधिकारी संगिता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी तीन दुकानांवर कारवाई करत नियम मोडणाऱ्या दुकानदारांना इशारा दिला आहे.

    राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांनी काढलेल्या मिशन ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावलीनुसार येवला शहरात परवानगी दिलेली दुकाने सकाळी सात वाजता उघडणे अपेक्षित असताना विंचूर रोड भागात असलेले हॉटेल मिलन, देवीखुंट परिसरातील जयहिंद आणि नागड दरवाजा परिसरातील फाईन किराणा ही दुकाने सिल करण्यात आली आहेत.